शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

कासवीतील रखडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू होणार

By admin | Updated: September 20, 2016 00:55 IST

देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे यांनी थेट कासवी गावाला भेट देऊन रखडलेल्या...

एसडीओंकडून चौकशी : लोकमतच्या वृत्ताची दखलजोगीसाखरा : देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे यांनी थेट कासवी गावाला भेट देऊन रखडलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याची चौकशी केल्यानंतर या रस्त्याचे बांधकाम पुन्हा तत्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदारांना त्यांनी दिले. यामुळे आता कासवीतील रखडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू होणार आहे.आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील कासवी येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम मागील २० दिवसांपासून बंद होते. त्यामुळे रस्त्यावरील गिट्टीच्या ढिगांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भातील वृत्त छायाचित्रासह लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी कासवी गावाला भेट देऊन रस्ता कामाची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूल अधिकाऱ्यांची चमू होती. कासवी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. सदर समस्येची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी रखडलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे, असे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले, असल्याचे कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एसडीओंनी थेट गावात येऊन रस्त्याची समस्या जाणून घेतली. आता येथील रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने कासवीवासीयांनी लोकमतचे आभार मानले. (वार्ताहर)