शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पर्लकाेटा पुलाचे काम अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

भामरागडला लागून असलेली पर्लकाेटा नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीवर ठेंगणा जुना पूल आहे. दर वर्षीच्या पावसाळ्यात पर्लकाेटा नदीला अनेकदा पूर येताे. परिणामी पुलावर पाणी चढून अहेरी मार्ग बंद हाेताे. भामरागडवासीयांचा गडचिराेलीशी संपर्क तुटताे. पावसाळ्यातील महापुरामुळे भामरागडातील नागरिक यातना सहन करतात. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन व भामरागडात दळणवळण व्यवस्था वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने पर्लकाेटा नदीवर पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देप्रतीक्षा कायम : नागरिकांची वन विभागाच्या कार्यालयावर धडक

  लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड नजीकच्या पर्लकाेटा नदीवरील मंजूर नवीन पुलाच्या कामाचे ग्रहण अजुनही सुटले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्व प्रक्रिया पार पाडून या कामाचे वर्कऑर्डर कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे या पुलाचे काम अजुनही सुरू झाले नाही. परिणामी याचा जाब विचारण्यासाठी भामरागडातील नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन उपवनसंरक्षकांना जाब विचारला.भामरागडला लागून असलेली पर्लकाेटा नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीवर ठेंगणा जुना पूल आहे. दर वर्षीच्या पावसाळ्यात पर्लकाेटा नदीला अनेकदा पूर येताे. परिणामी पुलावर पाणी चढून अहेरी मार्ग बंद हाेताे. भामरागडवासीयांचा गडचिराेलीशी संपर्क तुटताे. पावसाळ्यातील महापुरामुळे भामरागडातील नागरिक यातना सहन करतात. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन व भामरागडात दळणवळण व्यवस्था वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने पर्लकाेटा नदीवर पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. वन विभागाच्या नियम व कायद्याच्या अडचणीमुळे वर्कआदेश देऊनही कंत्राटदाराला पुलाचे काम सुरू करता आले नाही.  एकीकडे सरकार पुलाच्या कामाला मंजुरी देते तर सरकारच्या अधिनस्त असलेल्या वनविभागाचे कायदे या कामासाठी अडचणीचे ठरत आहे.पर्लकाेटा नदीवरील नवीन पुलाचे काम लवकर सुरू हाेऊन ते मार्गी लागावे, अशी आग्रही मागणी भामरागडवासीयांची आहे. दरम्यान काम सुरू न झाल्याचे पाहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शनिवारी विविध पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत वन विभागाचे कार्यालय गाठले. उपवनसंरक्षक एस.एल. बिलाेलीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान भामरागड वन विभागाचा प्रभार माझ्याकडे नुकताच साेपविण्यात आला आहे. पर्लकाेटा नदीवरील पुलाच्या कामासंदर्भातील माहिती घेऊन आपणास देताे, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. 

साहित्य व यंत्रसामग्री पडूनपर्लकाेटा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने या ठिकाणी माेठमाेठे मशीनरीज व यंत्रसामग्री आठ महिन्यांपासून भामरागड  येथे आणून ठेवली आहे. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे पुलाचे काम सुरू करता आले नाही. आता कंत्राटदार पूर्णत: कंटाळला असून हे साहित्य परत नेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग