लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्य महत्त्वाचे असून सुक्ष्म निरीक्षकांचे निरीक्षण यासाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक प्रवीण गुप्ता यांनी केले.गडचिरोली येथे शुक्रवारी सुक्ष्म निरीक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने आर.एस.धिल्लन, व्ही.आर.के.तेजा व जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक प्रक्रियेतील विषयांबाबत सखोल माहिती देण्यात आली. प्रत्येक सहा मतदान बुथमागे एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. त्या सहाही मतदान बुथवर सर्व प्रक्रियेवरती निरीक्षकांचे कार्य असणार आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य, सनियंत्रण पद्धती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना तसेच मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे सांगितले. प्रवीण गुप्ता, आर.एस.धिल्लन,व्ही.आर.के.तेजा यांनी उपस्थितांना विविध प्रश्न विचारून प्रशिक्षणातील विषयाबाबत पडताळणी केली. मतदान यादीत नाव नसेल, वेळेनंतर आलेल्या मतदारांचे काय, मतदान केंद्रात प्रवेश कोणाकोणाला, अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. सूक्ष्म निरीक्षकांनी नेमून दिलेल्या मतदान बुथवर जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल तासा-तासाला मुख्य निरीक्षक व जिल्हा निवणूक अधिकारी यांना द्यावे, असे प्रवीण गुप्ता यांनी सांगितले. या प्रशिक्षणात महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच कल्पना नीळ यांनी पोस्टल बॅलेजबाबत माहिती दिली.मतदार स्वाक्षरी अभियानास प्रारंभजिल्ह्यातील मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून अभियानास सुरूवात करण्यात आली. सदर स्वाक्षरी अभियानादरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावून मतदारांकडून मतदान करण्यासाठी तयार आहोत, या उद्देशाने स्वाक्षरी घेतली जाणार आहे. यासाठी मोठ्या आकाराचे बॅनर तयार करण्यात आले आहे. एका फलकावर हजारो स्वाक्षºया होतील, अशा पद्धतीचे हे बॅनर तयार करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक निरीक्षकांनी सेल्फी पार्इंटला भेट देऊन सेल्फी काढला.
निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST
गडचिरोली येथे शुक्रवारी सुक्ष्म निरीक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने आर.एस.धिल्लन, व्ही.आर.के.तेजा व जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक प्रक्रियेतील विषयांबाबत सखोल माहिती देण्यात आली. प्रत्येक सहा मतदान बुथमागे एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण
ठळक मुद्देप्रवीण गुप्ता यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत सूक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण