लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.चार वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने मंदिर दुरूस्तीचे काम हाती घेतले. काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यात मंदिर दुरूस्तीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या उदासीनतेमुळे मंदिर दुरूस्तीचे काम पूर्णता रेंगाळले आहे.वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या होणे व त्यांच्या जागी नवीन अधिकारी रूजू होणे यातच वेळ जात असल्याने मंदिर दुरूस्तीकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयांचे लक्ष नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना अडचणी जाणवत आहेत.भारतीय पुरातत्त्व विभाग चंद्रपूर यांची यंत्रणा व नियंत्रणाखाली काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षापासून केवळ दगड छिललेले दिसतात. मुख्य मंदिरासह १४ शिवालय असून त्यांची डागडुजी देखील करायची असल्याने शासनाचे कोट्यवधी रूपये कुठे खर्च होत आहेत, हे समजायला मार्ग नाही. एवढा खर्च करून कोणतेही काम दिसत नाही. वरिष्ठांच्या दिरंगाईमुळे सर्व भाविक व जनता हैैराण झाली आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी उमाजी जुनघरे, मुखरू शेंडे, मनोज हेजीब, चंदू गेडाम, रामूजी गायकवाड व नागरिकांनी केली आहे.मजुरांअभावी काम लांबणीवरकाम करणारे कारागिर राजस्थानचे असून ते प्रत्येक सणाला गावी जातात व १५ ते २० दिवस येत नसल्याने काम लांबणीवर पडते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नागपूर (उपविभाग चंद्रपूर) यांच्या आदेशानुसार कंत्राटदाराने केवळ सहा लोकांची टिम घेऊन व गावातील मजुरांना हाताशी धरून मंदिराचे काम सुरू केले. राजस्थानातून काम करण्यास आलेले मजूर कुशल कामगार आहेत. संबंधित विभागाने कंत्राटदारामार्फत त्यांच्याकडून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर दरवर्षी येणाºया विविध सणानिमित्त ते गावाकडे जातात. याचा परिणामी कामावर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कुशल मजुरांना काम द्यावे, अशी मागणीही होत आहे.
मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:34 IST
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मंदिर दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने
ठळक मुद्देदुरूस्तीला वेग नाही : पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी