सरळ मार्ग : पावसाळ्यापूर्वी मातीचे काम पूर्ण होणारगडचिरोली : कठाणी नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाला जोडण्यासाठी दोन्ही बाजुने मार्ग तयार करावा लागणार आहे. गडचिरोलीच्या बाजुने मार्ग तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. जुन्या पुलाच्या तुलनेत नवीन पूल जवळपास दोन पटीने उंच आहे. त्यामुळे तेवढ्याच उंचीचा मार्गही तयार करावा लागणार आहे. त्यासाठी हजारो ट्रॅक्टर माती लागणार आहे. पूल बांधकामाबरोबरच मार्ग तयार करण्याचेही काम अत्यंत महत्त्वाचे तेवढेच खाऊ असल्याने पूल बांधकाम कंपनीने पूल बांधकामाबरोबरच रस्ता निर्मितीच्या कामालाही सुरूवात केली आहे. या मार्गावर माती टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्यासाठी टाकलेली माती किमान एका पावसाळ्यामध्ये भिजणे आवश्यक आहे. अन्यथा त्यावरच्या मार्गाला भेगा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने कंपनीने मार्ग तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. नवीन पुलामुळे जवळपास ५०० मीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
कठाणी पूल मार्गाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 01:15 IST