शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:01 IST

चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत.

ठळक मुद्देकेवळ ३० टक्के कामांना मंजुरी : वर्ष संपत आले तरी ७० टक्के कामे बाकी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण होणे तर दूर, जेमतेम ३० टक्केच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे अभियान यावर्षी जिल्ह्यात थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.या आर्थिक वर्षातील कामे संपवून नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करण्याचे वेध सर्व विभागांना लागले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे नियोजन आणि समन्वय ठेवणाºया कृषी विभागाचे काम यावर्षी चांगलेच ढेपाळले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील ३५६७ कामांपैकी फेब्रुवारीपर्यंत केवळ १०८५ कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली.सिंचन प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे या जिल्ह्यात शेतीला सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी या अभियानात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड केली होती. दुसºया वर्षी १६९ गावांचा समावेश करण्यात आला. वर्ष २०१७-१८ मध्ये १११ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गावांमध्ये जलसंधारणाची ३५६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना केवळ १०८५ कामांनाच मंजुरी मिळाल्याने प्रशासनाकडूनच या अभियानाला खिळ लावली जात असल्याचे दिसते.ज्या १११ गावांमध्ये वेगवेगळ्या विभागांकडून जलसंधारणाची कामे नियोजित केली होती त्यात कृषि विभागामार्फत सर्वाधिक १९४६, मनरेगा मधून २०९, वनविभागामार्फत १२९६, जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत ४०, पाटबंधारे विभागामार्फत ४५ आणि चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत २ कामे प्रस्तावित केली होती.सर्व विभागांनी त्यांच्या लक्ष्यानुसार कामांचे नियोजन केले होते. पण मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव गेल्यानंतर त्यातील त्रृटी दूर करून सुधारित प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर ही कामे नरेगा (म.गां.राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले. नरेगामार्फत कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी दिली जाते. पण फेब्रुवारीपर्यंत ती मंजुरी अनेक कामांना मिळालीच नाही.पुढील वर्षीसाठी १०४ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीची अनेक कामे शिल्लक असली तरी पुढील वर्षीच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात २०१८-१९ मध्ये १०४ गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र ती गावे कोणती आणि तिथे कोणकोणती कामे केली जाणार याचे याचे नियोजन अद्याप झालेले नाही. ते नियोजन झाल्यानंतरच एकूण कामांची संख्या आणि त्यावर खर्च केल्या जाणाºया निधीची माहिती स्पष्ट होणार आहे.