शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:24 IST

गडचिरोली येथील बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बसस्थानकाचा विस्तार, बसस्थानक परिसरात डांबरीकरण व इतर कामे करायची आहेत. मात्र या सर्व बाबींचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देदीड वर्षांचा कालावधी उलटला : निम्म्याहून अधिक कालावधी शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बसस्थानकाचा विस्तार, बसस्थानक परिसरात डांबरीकरण व इतर कामे करायची आहेत. मात्र या सर्व बाबींचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. दीड वर्षांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत बरेच काम शिल्लक आहे.गडचिरोली हे जिल्हास्तरावरील बसस्थानक आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील बसेस गडचिरोली येथे येतात. तसेच गडचिरोली येथून ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. त्यामुळे सदर बसस्थानकावर अधिकचे फलाट असणे आवश्यक होते. केवळ चार फलाट असल्याने बऱ्याचशा बसेस बसस्थानक परिसरात अशाच उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे बसच्या समोर जाऊन प्रवाशांना नेमकी बस कुठे चालली हे बघावे लागत होते. परिणामी प्रवाशांना बसस्थानकाच्या बाहेरच ताटकळत बसावे लागत होते.फलाटांची संख्या वाढवून प्रवाशांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यासाठी बसस्थानकाचे नूतनीकरण व विस्ताराचे काम मागील दीड वर्षांपासून हाती घेतले आहे. मात्र दीड वर्षांचा कालावधी होऊनही केवळ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीची फिनिशिंग व इतर कामे बाकी आहेत.विस्तारित झालेल्या इमारतीत प्रवाशांना बसण्यासाठी केवळ बाक बनविण्यात आले आहेत. बसस्थानकाच्या बांधकामासाठी अर्ध्या जागेवर टिन लावून जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सध्या वापरासाठी केवळ अर्धीच जागा शिल्लक आहे. अर्ध्या बसेस बसस्थानकाच्या समोर तर अर्ध्या बसेस बसस्थानकाच्या मागील बाजूस उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमधील पाणी तुडवित समोर जावे लागते. मागील दीड वर्षांपासून प्रवाशी कमालीचे त्रस्त आहेत.कामाची गती वाढविण्याबाबत कंत्राटदाराला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.रेतीचे सांगितले जाते कारणमागील चार महिने रेती मिळाली नाही. त्यामुळे बांधकामाची गती मंदावली, असे कारण कंत्राटदार सांगत आहे. मात्र चार महिन्यांपूर्वी रेती मिळत होती. आताही मूबलक प्रमाणात रेती उपलब्ध आहे. त्यामुळे रेती न मिळण्याचे सांगितले जाणारे कारण पुरेसे नाही. अर्धीअधिक जागा बांधकामासाठी कंत्राटदाराने ताब्यात घेतली असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याच गतीने काम सुरू राहिल्यास काम पूर्ण होण्यासाठी पुन्हा दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :state transportएसटी