शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार घरकुलांचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:17 IST

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेनाशी झाली आहे.

ठळक मुद्देरेतीअभावी कामे प्रभावित : जिल्हाभरात १३५ घरकूल कामांना प्रारंभच नाही

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेनाशी झाली आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील घरकुलांचे काम प्रभावित झाले आहेत. तीन वर्षांतील मिळून अद्यापही पाच हजार ४९ घरकुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे.२०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांचे मिळून गडचिरोली जिल्ह्याला एकूण १० हजार १८७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १० हजार १८७ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये आहेरी तालुक्यात १ हजार ९४२, आरमोरी तालुक्यात ७२५, भामरागड तालुक्यात २४६, चामोर्शी ८६३, देसाईगंज ४४६, धानोरा ७९७, एटापल्ली ५४९, गडचिरोली ६५७, कोरची ६५७, कुरखेडा ११२१, मुलचेरा २८५ व सिरोंचा तालुक्यात १ हजार ८८७ घरकुलांचा समावेश आहे. तीन वर्षांचे मिळून आतापर्यंत बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी केवळ ५०.३२ आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या एकूण ३ हजार १३१ लाभार्थ्यांना चवथ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम आॅनलाईन स्वरूपात अदा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १३५ घरकुलांच्या कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. यामध्ये अहेरी तालुक्यातील सर्वाधिक ६८, एटापल्ली १७, सिरोंचा १२, भामरागड ९ व चामोर्शी तालुक्यातील १० घरकुलांचा समावेश आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रेती मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय शासकीय इमारतीचे कामे प्रभावित झाले आहेत. रेतीसाठी घरकूल लाभार्थी ट्रॅक्टरधारकांकडे धावपळ करीत आहेत.कंत्राटदारांचा रस्ता खडीकरणावर भरलिलाव प्रक्रियेअभावी रेतीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरासह जिल्हाभरातील कंत्राटदारांचा रस्ता खडीकरणाच्या कामावर भर असल्याचे दिसून येत आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे ठप्प आहेत.अहेरी उपविभागात कामाची गती मंदावलीप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अहेरी उपविभागाच्या मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व अहेरी या पाच तालुक्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत हजारो घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र या उपविभागात ४० टक्केच घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रेतीघाटांअभावी रेती मिळणे कठीण झाले आहे. तसेच लाभार्थ्यांची अनास्था, प्रशासकीय उदासीनता व इतर कारणामुळे अहेरी उपविभागात घरकुला बांधकामात गती नसल्याचे दिसून येत आहे.