लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-रामाळा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लॉकडाऊनपूर्वी सुरू झाले होते. दरम्यान कंत्राटदाराने सुरूवातीला या रस्त्यावर मोठी गिट्टी टाकून चुरी पसरविली. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले आहे.काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची संचारबंदी असल्याने सदर रस्त्यासाठी लागणाऱ्या डांबराचा पुरवठा होत नसल्याने हे काम रखडले असल्याची माहिती कंत्राटदाराकडून मिळाली. पावसाळ्याला सुरूवात झाली असून आता पावसाळ्यात हे काम पूर्ण होणे शक्य होत नाही. सदर रस्त्यावरील टाकलेली गिट्टीची योग्यरित्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या गिट्टीमुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर याच मार्गाने बाहेरगावचे विद्यार्थी भेंडाळा येथे ये-जा करतात. त्यामुळे गिट्टी उचलण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.सदर रस्त्याचे काम लॉकडाऊनपूर्वी सुरू झाले होते. मात्र लॉडाऊनमुळे हे काम ठप्प पडले. डांबराचा पुरवठा होत नसल्याने आताच या कामाची सुरूवात करू शकत नाही. सप्टेंबर महिन्यापासून डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. सदर रस्त्यावर जी गिट्टी उखडली आहे. ती उचलण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मी संबंधित कंत्राटदाराला सांगितले होते. लवकरच गिट्टी उचलण्यात येईल.- भाऊसाहेब गौरकार,कनिष्ठ अभियंता, जि.प.उपविभाग, चामोर्शी
भेंडाळा-रामाळा मार्गाचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST
काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची संचारबंदी असल्याने सदर रस्त्यासाठी लागणाऱ्या डांबराचा पुरवठा होत नसल्याने हे काम रखडले असल्याची माहिती कंत्राटदाराकडून मिळाली.
भेंडाळा-रामाळा मार्गाचे काम अपूर्ण
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे रखडले डांबरीकरण : परिसरातील नागरिकांना त्रास; रस्ता दुरूस्त करण्याची मागणी