वनविभागाचे दुर्लक्ष : आरमोरी आगाराच्या बिटातीलभीमराव मेo्राम - जोगीसाखरावनविभागाच्या आरमोरी बिट आगारामध्ये गेल्या ५ वर्षापूर्वीचे लाकडे ठेवण्यात आली आहे. या लाकडांवर उदळी चढून ते पूर्णत: जीर्ण झाले आहेत. परिणामी वनविभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे. वनविभागाशी अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील विविध जंगल कामगार सहकारी संस्थांमार्फत दरवर्षी कुपकटाई करून लाकडे विक्रीसाठी बिटामध्ये ठेवली जातात. पूर्वी स्थानिक पातळीवर बिटामध्येच लिलाव प्रक्रिया राबवून लाकडांची विक्री केल्या जात होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र या लिलाव प्रक्रियेत स्थानिक शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सहभागी होताना दिसून येत नाही. यामुळे कित्येक वर्ष बिटामध्ये लाकडे तसेच पडूून राहत आहेत. अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने आगारातील नवीन लाकडाकडे व्यापारी आकर्षीत होतात. मात्र जुन्या लाकडांच्या फेरलिलावाकडे व्यापारी वर्ग वळत नसल्याचे दिसून येत आहे. वनविभागाचे अधिकारीसुध्दा लाकडाच्या फेरलिलावाबाबत पाहिजे त्या प्रमाणात गंभीर नाहीत. यामुळेच अनेक बिटातील लाकडे जीर्ण होत आहेत. वनविभागाच्या ऑनलाईन लिलाव प्रक्रियेमुळे चांगली किंमत येणारे सागवान लाकडेही मातीमोल होत आहे. मात्र याचे वनविभागाच्या अधिकार्यांना काहीही देणेघेणे नाही. शासनाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना बिटातील लाकडांची १५ ते २५ टक्क्याने किंमत कमी करून लिलाव करण्याचा अधिकार दिल्यास बिटातील लाकडे जीर्ण होणार नाहीत. असाही विरोधाभासएकीकडे वनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, जंगलातील झाडे सरपणासाठी तोडल्या जाऊ नये याकरिता वनविभागाच्यावतीने वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना सवलतीवर गॅस सिलिंडर पुरविण्याची योजना राबविली जात आहे.तर दुसरीकडे वनविभागाच्या ऑनलाईन क्लिष्ट लिलाव प्रक्रियेमुळे नागरिकांना सरपणासाठी सहज जळाऊ लाकडे उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. जीर्ण लाकडांमुळे वनविभागाचे नुकसान होत आहे. तर सर्वसामान्य नागरिक सरपणासाठी छुप्या मार्गाने लाकडाची तस्करी करीत आहेत.
लाकडे कुजली
By admin | Updated: June 7, 2014 23:55 IST