शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महिलाशक्तीला कमी लेखून चालणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:05 IST

महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

ठळक मुद्देचित्रा वाघ यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचा आलापल्ली येथे महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. मेळाव्याला माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, अहेरी विधानसभा प्रमुख राजेंद्र वैद्य, माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, बेबी उईके, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, जि.प.सदस्य ग्यानकुमारी कौशी, एटापल्लीच्या सभापती बेबी लेकामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्ते शाहीन हकीम, पं.स.सदस्य प्रांजली शेंबळकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, आलापल्लीचे माजी सरपंच रेणुका कुळमेथे, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना चित्रा वाघ म्हणाल्या, स्वयंपाक घरातील किराणा, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट झाले आहे. त्यामुळे जगने कठीण झाले आहे. नोटबंदी पूर्णपणे फसली आहे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यमान शासनाला धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे. महिलांबाबत बेताल व्यक्तव्य करण्याची हिंमत सरकारमधील मंत्री करीत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे.नारीशक्तीमध्ये फारमोठी ताकद आहे, ही ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. महिलांनी स्वत:च्या अधिकार व हक्काबाबत जागरूक असले पाहिजे. स्वत:च्या संसाराचा गाडा हाकतानाच बाहेरच्याही जगाकडे लक्ष घालले पाहिजे. महिलांनी राजकारणात पुढे यावे, महिलांमध्ये फार मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले.कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या शाहिन हकीम यांची जिल्हा महिला कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस