शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा दारूविक्रेत्यांना सज्जड दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:18 IST

तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा इशारा महिलांनी दारूविक्रेत्यांना दिला.

ठळक मुद्देसूर्यडोंगरीतील अवैध दारूविक्री । बंद झालेली दारूविक्री आठ महिन्यानंतर पुन्हा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा इशारा महिलांनी दारूविक्रेत्यांना दिला.आठ महिन्यापूर्वी इंजेवारी, पेठतुकूम, देलोडा बु., देऊळगाव आणि किटाळी येथील गावकऱ्यांनी मिळून बंद केलेली सूर्यडोंगरीची दारूविक्री खूप गाजली होती. या पाचही गावांनी मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून आपल्या गावात दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेत विक्री बंद केली. पण सूर्यडोंगरी गाव याला अपवाद होते. गावात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर होता. त्यामुळे हे गाव बाकी गावांसाठी डोकेदुखी ठरले होते. परिणामी या पाचही गावांतील लोकांनी सूर्यडोंगरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी मोठी बैठक घेत आरमोरी पोलीस स्टेशनवर धडक दिली.लोकांचा निर्धार पाहून उपविभागीय दंडाधिकारी विशाल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी सूर्यडोंगरी गावात त्याच रात्री बैठक घेत विक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्याविषयी अल्टिमेटम दिला होता. विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सूर्यडोंगरीची दारूविक्री थांबली. ही पाचही गावे दारूविक्रेत्यांवर नजर ठेवून होतीच. पण आठ महिन्यांनी येथील दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती किटाळीच्या महिलांना मिळाली. दारू गाळून त्याची बाहेर तस्करी केली जात असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महिलांनी गुरुवारी सूर्यडोंगरी गाव गाठत विक्रेत्यांना दम देत विक्री बंद करण्यास सांगितले.आरमोरी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून कारवाईची मागणी महिलांनी केली आहे. नव्याने पुन्हा दारूविक्री सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार किटाळी येथील महिलांनी व्यक्त केला. पोलीस कधी कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.परिसराच्या गावातील दारूडे सकाळ व सायंकाळच्या सुमारास सूर्यडोंगरी येथे दाखल व्हायचे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची गर्दी असायची.घनदाट जंगलाचा आधारसूर्यडोंगरी गावापासून देलोडापर्यंत घनदाट जंगल आहे. शिवाय हा जंगल सिर्सी गावापर्यंत पसरला आहे. लहान टेकड्या असल्याने घनदाट जंगलाचा आधार घेऊन अवैध दारूविक्रेते दारू गाळून त्याची विक्री करीत असत. काही दिवस या जंगलात बिबट्याचेही बस्तान होते. तरी सुद्धा दारूडे रात्री उशिरापर्यंत येथून फिरत असत.

टॅग्स :liquor banदारूबंदी