शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

दारूबंदीसाठी महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

तालुक्यातील सालमारा, पाथरगोटा, पळसगाव आणि जोगीसाखरा येथील मुक्तिपथ गाव संघटन कार्यकत्यांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमूद्वारे घेण्यात आली. दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

ठळक मुद्देजोगीसाखरा येथे क्लस्टर कार्यशाळा : परिसरातील दारू विक्रेत्यांवर कारवाईबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील सालमारा, पाथरगोटा, पळसगाव आणि जोगीसाखरा येथील मुक्तिपथ गाव संघटन कार्यकत्यांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमूद्वारे घेण्यात आली. दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.जोगीसारखा येथे पार पडलेल्या बैठकीला सरपंच चंदू गरथडे, पोलीस पाटील वासुदेव शेडमके, मुक्तिपथ संचालक मयूर गुप्ता, तालुका संघटक नीलम हरिणखेडे, रितेश कुमार यांच्यासह गावसंघटनेचे ३२ कार्यकर्ते उपस्थित होते.सालमारा, पाथरगोटा आणि पळसगाव येथील संघटनेने गावातील दारूविक्री बंद केली आहे. तसेच ती टिकून राहण्यासाठी गाव संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. दारूबंदी करताना व ती टिकवून ठेवताना आलेले अनुभव या कार्यशाळेत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सोबतच दारूबंदी असल्याने बदललेले गावाचे वातावरण याविषयीसुद्धा सांगितले.मुक्तिपथ संघटना व पोलीस कारवाई करीत असले तरी जोगीसाखरा गावात अद्याप दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. सालमारा, पाथरगोटा आणि पळसगाव या गावांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. दारूविक्री बंद असलेल्या गावातील लोक आता जोगीसाखरा येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. त्यामुळे चारही गावांच्या प्रयत्नातून दारूविक्री कशा प्रकारे बंद करता येईल यावर चर्चा झाली. जोगीसाखरातील दारूविक्री बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार गाव संघटनेने केला.दारूविक्रेत्यांना बजावणार नोटीसजोगीसाखरासह परिसरातील अनेक गावांमध्ये दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. अशा गावातील दारूडे जोगीसाखरा येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका आहे. त्यादृष्टीने जोगीसाखरातील दारू बंद करण्याकरिता गावातील १२ दारूविक्रेत्यांची यादी गाव संघटनेने तयार केली आहे. या विक्रेत्यांना पोलीस पाटलांद्वारे नोटीस दिले जाणार आहे. तसेच या विक्रेत्यांनी इतर गावात जाऊन दारू विकण्याचा प्रयत्न केल्यास तत्कार पोलीस स्टेशनला तक्रार करणार, असा निर्धारही गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

टॅग्स :Socialसामाजिक