शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:40 IST

महिलांनी बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून त्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा, तसेच महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांनी केले.

ठळक मुद्देनगरध्यक्षांचे प्रतिपादन : गडचिरोली नगर पालिकेत उद्योजकता विकास कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महिलांनी बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून त्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा, तसेच महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांनी केले.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थानिक नगर पालिकेच्या वतीने बुधवारी न.प.मध्ये आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सोरते, महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, उपसभापती वैष्णवी नैताम, नगरसेविका लता लाटकर, नीता उंदीरवाडे, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष पिपरे यांनी न.प. च्या वतीने बँकांकडे पाठविण्यात आलेली वैयक्तिक कर्ज प्रकरणे, महिला बचतगटांची कर्ज प्रकरणे, वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना व्यवसायिक कौशल्य, व्यावहारिकपणा, हितसंबंध आदीबाबत मार्गदर्शन केले. बँक आॅफ इंडियाच्या जिल्हा अग्रणी प्रबंधकांनी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाविषयी व ग्राहकांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश ठाकरे यांनी केले तर आभार गणेश नाईक यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाल गजबे, महेश निलम, छगन काळबांधे, दिनेश धोटे, मोंगसू मडावी आदींनी सहकार्य केले. सोरते यांनीही आर्थिक साक्षरतेविषयी महिलांना माहिती दिली.