गडचिरोली : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) तर्फे अहेरी तालुक्यांतर्गत वेलगूर ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या आशीर्वाद, गंगा व गायत्री महिला बचत गटाने शौचालय बांधकाम केले. त्यासाठी त्यांचा गौरव गडचिरोली येथे शनिवारी जिल्हा परिषदेत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, कृषी सभापती अजय कंकडालवार, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, जि.प. सदस्य विजया विठ्ठलानी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत माळी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी स्वच्छ भारत मिशनच्या शौचालय बांधकामासाठी महिला बचत गटांनी समोर येऊन स्वत:च्या विकासाबरोबर गावातील शौचालय बांधकामाची संख्या वाढवून गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच बचत गटाला रोजगार उपलब्ध झाला, असे प्रतिपादन केले. जि.प. अध्यक्ष कुत्तरमारे यांनी शासनाच्या योजनेचा योग्य उपयोग करून गाव हागणदारीमुक्त करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक अमित माणुसमारे, संचालन रतन शेंडे तर आभार योगेश फुसे यांनी मानले.
शौचालय बांधकामासाठी महिला बचत गट सन्मानित
By admin | Updated: June 22, 2016 00:44 IST