शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अंकिसात महिलांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

आसरअली पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाडी मारून कारवाई केली होती. तसेच या विक्रेत्यांची यादीही पोलिसांना दिली. पण अद्याप ठोस कारवाई न झाल्याने दारूविक्री सुरूच आहे.

ठळक मुद्देदारू विक्रेत्यांवर कारवाई करा : १२ गावातील १०० महिलांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गावातील दारूविक्री बंद करा आणि पोलिसांना नावे दिलेल्या दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी तालुक्यातील अंकिसा येथे सोमवारी (दि.१८) सिरोंचा मार्गावर महिलांनी तीन तास चक्काजाम केला. यात १२ गावातील जवळपास १०० महिला व अंकिसा येथील युवक सहभागी झाले होते. कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन थेट जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्याचा निर्धार महिलांनी यावेळी बोलून दाखविला.आसरअली पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाडी मारून कारवाई केली होती. तसेच या विक्रेत्यांची यादीही पोलिसांना दिली. पण अद्याप ठोस कारवाई न झाल्याने दारूविक्री सुरूच आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी अंकिसा-सिरोंचा रस्त्यावर ३ तास चक्काजाम आंदोलन केले.या आंदोलनात बालमुत्त्यमपल्ली, गेरापल्ली, जंगलपल्ली, लक्ष्मीदेवपेठा, लक्ष्मीदेव रै., अंकिसा माल, अंकिसा चक, केवलपेठा, रंगधामपेठा, जोड्पल्ली, दुब्बापल्ली, वडधम येथील जवळपास १०० महिला सहभागी झाल्या होत्या. गावात दारूविक्री बंद व्हावी यासाठी युवकही मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. या महिलांच्या समर्थनार्थ तेही आंदोलनात दोन्ही बाजूला मानवी साखळी तयार करून उभे होते. चक्काजाम आंदोलनाची दखल घेत आसरअली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरेश्वर दराडे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांना आंदोलनकर्त्यांनी मागणीचे निवेदन देत विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी विनंती केली. तीन तासानंतर हे आंदोलन थांबल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

टॅग्स :Chakka jamचक्काजाम