शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:32 IST

गडचिरोली येथे होत असलेली ३० वी महिला परिषद असून या परिषदेतून महिलांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता यांचा आदर्श देऊन समता व बंधूत्त्वाच्या मार्गाने चालावे.

ठळक मुद्देभैय्याजी खैरकर यांचे प्रतिपादन : पंचशील बुद्ध विहारात महिला परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथे होत असलेली ३० वी महिला परिषद असून या परिषदेतून महिलांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता यांचा आदर्श देऊन समता व बंधूत्त्वाच्या मार्गाने चालावे. महिलांनी संघटित होऊन नागपूर येथे २२ ते २४ आॅक्टोबर दरम्यान होणाºया महिला परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूरचे भैय्याजी खैरकर यांनी केले.पंचशील महिला व समाज मंडळ रामनगर, शाहूनगर, कॅम्प एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील बुद्धविहाराच्या पटांगणात जिल्हास्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन डॉ. यशवंत दुर्गे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. माधुरी गायधने, सुष्मा भट, वंदना वनकर, योगिता सहारे, सिद्धार्थ गोवर्धन, प्रतिभा चौधरी, विश्रोजवार, म्हस्के, प्रभाकर सोनडवले, प्रा. एस. एस. जांभुळे, हेमंत मेश्राम, दर्शना मेश्राम उपस्थित होत्या.परिषदेत डॉ. दुर्गे, सोनडवले, म्हस्के यांचा शाल, व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. २० आॅगस्ट १९४२ ला बाबासाहेबांनी देशातील महिला परिषद आयोजित केली. या परिषदेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने नागपूर येथे २२ ते २४ आॅक्टोबर २०१७ रोजी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. माधुरी गायधने यांनी केले.फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचार प्रवाहात येऊन संविधानाने दिलेल्या हक्क व कर्तव्याचे पालन केल्यास ओबीसी महिलांची उन्नती होईल, असे प्रतिपादन सुषमा भट यांनी केले. संचालन वनिता बांबोळे तर आभार धारा मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी सिद्धार्थ गोवर्धन, डी. आर. जांभुळकर, बोरकर, प्रेमकुमार मेश्राम, रामटेके, निलेश फुलझेले, नागसेन खोब्रागडे, उत्तम मेश्राम, सुप्रिया मेश्राम, राखी मेश्राम, शीला शेंडे, राखी गोवर्धन, मीनल देवगडे, गेडाम, तारा खोब्रागडे, मालता मेश्राम, केसलापुरे यांनी सहकार्य केले.