शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महिलांनी उभी केली आर्थिक ताकद

By admin | Updated: October 20, 2015 01:40 IST

विधवा, गरीब, घटस्फोटित महिलांनी एकत्र येऊन एक आर्थिक शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निर्माण केला आहे, ते वैष्णोदेवी

विधवा, गरीब, घटस्फोटित महिलांनी एकत्र येऊन एक आर्थिक शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निर्माण केला आहे, ते वैष्णोदेवी महिला बचत गट आरमोरीने. २००४ मध्ये सुरू झालेल्या या बचत गटाचे काम रोपट्याच्या रूपाने सुरू होऊन वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ज्या महिलांना कधीकाळी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी येत होत्या. त्यावर मात करीत आता या बचतगटाने यशाची नवी दारे आपल्यासाठीच उघडली आहेत. यातून त्यांनी मोठी भरारी घेतली असून हा बचत गट आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. २ सप्टेंबर २००४ रोजी आशा विजय बोडणे यांच्या पुढाकाराने वैष्णोदेवी महिला बचत गटाची स्थापना झाली. बोडणे या घटस्फोटित महिला होत्या. आर्थिक अडचण त्यांना नेहमीच प्रगतीसाठी अडचणीची ठरत होती. यावर मात करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या एका मुलीसोबत माहेरी राहायला आल्यावर वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडेही त्या पैशासाठी हात पसरू शकत नव्हत्या. अशावेळी त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या विधवा, गरीब महिलांना एकत्र आणून १५ महिलांची मोट बांधली व यांच्या माध्यमातून एका बचतगटाची निर्मिती केली. सुरूवातीला बँकेकडून बचत गटासाठी पाच हजार रूपयांचे कर्ज उचलले. तीन एकर शेती केली व बँकेच्या पैशाची परतफेड करून उरलेल्या रकमेत बस स्टँडच्या बाजूला झुणका-भाकर व भाजी-पुरीचा व्यवसाय सुरू केला. काही महिला जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकाचे काम करू लागल्या. याच काळात एका महिलेचा पती आजारी पडला. महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र मिळून त्या महिलेसाठी आर्थिक सहाय्य उभे केले. बचत गटा व्यतिरिक्तही शोषित, पीडित, विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य देण्याचे काम त्यांनी सुरू केले. एका महिलेला केळी विकण्याचा व्यवसाय टाकण्यासाठी आर्थिक पाठबळ या बचत गटाने दिले. आरमोरी शहरात स्थापन झालेला हा महिलांचा पहिला बचत गट होता. याचा आदर्श घेत कालांतराने अनेक बचत गट निर्माण होत गेले. परंतु महिलांसाठी आर्थिक प्रगतीचे पहिले पाऊल टाकण्याचे काम आशा बोडणे यांच्या नेतृत्वातील वैष्णोदेवी महिला बचत गटाने केले. या बचत गटाच्या यशाची भरारी सर्वदूर पसरल्यावर शासनाने त्यांच्याकडे रेशन दुकान व केरोसीनचा परवाना दिला. त्या माध्यमातून २०११ मध्ये रॉकेल व्यवसाय या बचत गटाने सुरू केला. १५ महिला आज यामध्ये काम करीत आहेत. यात अध्यक्ष म्हणून प्रतिभा नानाजी कोल्हे, सचिव आशा बोडणे, उषा तिजारे, मीरा खोब्रागडे, वेणू राजगिरे, कमल जवजांलकर, विमल मेश्राम, जिजा कोल्हे, प्रेमिला कोल्हे, प्रेमिला तिजारे, भारती चिलबुले, लता कोल्हे, सुशीला कोल्हे, ज्योती घाटुरकर, सिंधू सोरते यांचा समावेश आहे. यात एक घटस्फोटित महिला असून सात विधवा महिलांना घेऊन १५ महिलांची ही नारीशक्ती त्यांच्याच जीवनातला आर्थिक अंधार दूर करण्यासाठी पणतीच्या भूमिकेतून काम करीत आहेत.