शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

स्वयंपाकी महिलांना अल्प मानधन; ते पण अनेक महिन्यांपासून थकीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:33 IST

मानधनवाढ करण्याची मागणी : शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांचे मानधन वाढविण्यात यावे व त्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

पक्षाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांचीही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार ही योजना २०१५ पासून सुरू करण्यात अली असून, स्वयंपाकी म्हणून महिलांची फक्त १००० रुपये एवढ्या क्षुल्लक मानधनावर नियुक्ती करण्यात अली आहे. मागील ९ वर्षांपासून या महिला हे काम नियमितपणे आपले काम करून शासनाची व जनतेची सेवा करीत आहेत; परंतु अनेकदा मागणी करूनही त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. अंगणवाड्यांमध्ये संपूर्ण स्वयंपाक करण्याचे अतिशय महत्त्वाचे व मेहनतीचे काम या महिला करीत आहेत. एवढ्या कमी रकमेत महिलांकडून काम करून घेणे हे एकप्रकारे त्या महिलांचे शोषण आणि वेठबिगारी व मानव अधिकारांचे उल्लंघन आहे आणि समस्त महिलांचा अवमान आहे. शासनाच्या किमान वेतन कायद्याचे तर हे सरळसरळ उल्लंघन आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. 

निवेदन देताना रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव समृतवर, प्रदीप भैसारे, कृष्णा चौधरी, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, स्वयंपाकी संघटनेच्या गीता उईके, अंजू गेडाम, सरिता गवळे, प्रियांका रामटेके उपस्थित होते. 

किमान २० हजार रुपये मानधन द्यावे स्वयंपाकी महिलांचे हे शोषण त्वरित थांबविण्यात यावे व त्यांचे मानधन किमान २० हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने यावेळी केली. हे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थकीत मानधन लवकरच अदा करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली