शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत वीज पडून एक महिला ठार, नऊ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:26 IST

कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली.पोसक्का चिन्ना तोटावार (३५) रा. चिंचगुंडी असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये अरविंद मल्लेश गुम्पा (८), लक्ष्मी मलेश गुम्पा (४०) दोघेही रा. रेगुंटा, गणपत नागना कुमराम (३८), सारका लचमा पानेम (१५), नागुबाई बापू पानेम (२२), वैशाली लिंगा तोटावार (१८), सुनिता श्रीकांत टेकुलवार (२५), स्नेहा शंकर पानेम (१७), मेलेश्वरी शंकर पानेम (३५) सर्व रा. चिंचगुंडी अशी जखमींची नावे आहेत.दुपारच्या जेवनासाठी सर्व मजूर शेतातीलच आंब्याच्या झाडाखाली बसले होते. दरम्यान मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात होऊन झाडावर वीज कोसळली. यात पोसक्का ही जागीच ठार झाली, तर इतर मजूरही जखमी झाले. जखमींना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. डॉ.चेतन इंगोले व डॉ.रविंद्र वाठोरे हे जखमींवर उपचार करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजAccidentअपघात