शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हातात विळा घेऊन शेतमजूर महिलेने दिली वाघाशी झुंज; गडचिरोली जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 22:36 IST

Gadchiroli News शेतात काम करताना अचानक वाघाने शेतमजूर महिलेवर समोरून हल्ला केला. तिनेही प्रसंगावधान राखत हाततल्या विळ्यानेच त्याच्यावर हल्ला चढवला आणि मदतीचा पुकारा केला.

ठळक मुद्देपरतवला वाघाचा हल्लाहिमतीने दिली वाघाशी झुंजदुसरीकडे गुराख्यानेही वाचविला जीव

गडचिरोली : गडचिरोली विभागांतर्गत आणि चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका हिम्मतवान महिलेने वाघाशी झुंज दिली. तिच्या मदतीला इतर मजूर महिला धावून आल्या आणि या महिलांनी वाघाचा हल्ला परतवून लावत स्वत:चा जीव वाचवला. ही घटना जोगना उपक्षेत्रातील मुरमुरी जंगलाजवळच्या शेतात घडली. दुसरीकडे भाडभिडी जंगल परिसरात एका गुराख्यासमोर वाघ येऊन उभा ठाकला. त्याने पळ काढत आणि इतर लोकांनी काठ्या घेऊन आरडाओरड केल्याने तोसुद्धा वाघाच्या तावडीतून बचावला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सरिता देवाजी चहाकाटे, रा. मुरमुरी ही महिला गावातील इतर महिलांसोबत जंगलालगत असलेल्या शेतशिवारात धानपीक कापण्यासाठी गेली होती. धानाच्या कडपा कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर समोरासमोर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने न घाबरता हातात असलेली धानकाती (विळा) वाघाच्या दिशेला भिरकावून आरडाओरड केली. त्यामुळे जवळपास असलेल्या इतरही महिलांनी आरडाओरड करत तिच्या मदतीसाठी धाव घेतली. अखेर वाघाला माघार घेऊन पळ काढावा लागला. ही घटना दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान घडली. वनविभागाचे क्षेत्र सहायक विवेकानंद चांदेकर यांनी पंचनामा केला असता त्या ठिकाणी वाघाचे पंजे आढळून आले.

दुसऱ्या घटनेत भाडभिडी येथील नारायण नैताम हा गुरे घेऊन जंगलात गेला असता, गुरे पांगवत असताना समोरच वाघ बसलेला दिसला. त्याला पाहताच नारायण याने आरडाओरड करत तेथून पोबारा केला. हे पाहून इतर गुराखी काठ्या घेऊन आरडाओरड करीत वाघाच्या दिशेने धावले. त्यामुळे वाघ पळून गेला. ही घटना जोगना जंगल परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, कुथेगाव येथील एका दुचाकी चालकालाही रस्त्यावरच वाघ दिसल्यामुळे त्याला दुचाकीसह माघारी फिरावे लागले. जंगलात वेळी अवेळी फिरणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघ