शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या लग्नाची तारीख ठरण्याआधीच गेली माय ! नाव दुर्घटनेतील तिसरा मृतदेह आढळला

By संजय तिपाले | Updated: January 24, 2024 11:55 IST

सासू- सुनेसह तिघींचा शोध सुरुच

गडचिरोली : लेकीचे हात पिवळे करायचे होते.. पै- पै जमवायचे होते.... पती सकाळी तारीख ठरविण्यासाठी वराच्या गावी गेले अन् आई मिरची तोडणीच्या कामाला.. पण वडील वराच्या गावी पोहोचण्याआधीच इकडे आई नाव दुर्घटनेत बुडाली. २४ जानेवारीला सकाळी ८ वाजता तिचा मृतदेह आढळला. रेवंता हरिश्चंद्र झाडे (४२, रा. गणपूर रै. ता. चामोर्शी) असं या दुर्दैवी मातेचं नाव.

 मिरची तोडण्यासाठी नदीपात्रातून जाताना मजूर महिलांच्या दोन नाव बुडाल्या. एका नावेतील आठ जण सुखरूप वाचले तर दुसऱ्या नावेतील सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याची हृदयद्रावक घटना गणपूर (रै.) येथील वैनगंगा नदीपात्रात २३ जानेवारी सकाळी साडेदहा वाजता घडली होती. नावाडी सुरेंद्र शिंदे (३०, रा. टोक ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) व सरुबाई सुरेश कस्तुरे (५८, रा. गणपूर रै.) हे थोडक्यात वाचले होते. २३ जानेवारी रोजी शोधकार्यानंतर जिजाबाई दादाजी राऊत (५५) व  पुष्पा मुक्तेश्वर झाडे (४२, दोघी रा. गणपूर रै.) यांचे मृतदेह आढळले हाेते, तर चार जणी बेपत्ता होत्या. २४ रोजी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केले. स्थानिक तरुण नावेतून तर राज्य आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या बोटेतून शोध घेत होत्या. रेवंता झाडे यांचा मृतदेह २४ रोजी सकाळी नाव उलटलेल्या ठिकाणापासून जवळच एका झुडूपाला अडकलेल्या स्थितीत गावातील तरुणांना आढळून आला. त्यांनी तो नावेतून बाहेर आणला. मायाबाई अशोक राऊत (४५) व सुषमा सचिन राऊत (२२) या सासू- सुनेसह बुधाबाई देवाजी राऊत (६५, तिघीही रा. गणपूर रै.) यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

सुखाचे क्षण दु:खात, कुटुंब शोकमग्न

रेवंता झाडे यांचा मृतदेह आढळल्यानंतर कुटुंब शोकमग्न झाले. त्यांना मुलगी शेखर व कन्या काजल अशी दोन अपत्ये आहेत. मुलगा दहावीत शिकतो तर मुलगी काजल हिने पदवीचे शिक्षण घेतलेले असून चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सामदा गावात तिचा विवाह ठरला होता. २३ जानेवारीला पती हरिश्चंद्र झाडे हे काजलच्या लग्नाची तारीख ठरविण्यासाठी नियोजित वराच्या गावी सामदा येथे गेले होते. मात्र, वाटेतच त्यांना पत्नी बुडाल्याची माहिती कळाल्यावर ते परत आले. मुलीचे लग्न जुळल्यामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, पण रेवंता यांच्या मृत्यूने सुखाचे क्षण दु:खात बदलले.राज्य आपत्ती निवारण दलाचे दोन चमू दाखल

गणपूर रै. येथील तीन महिला अद्यापही सापडलेल्या नाहीत. २४ जानेवारीला सकाळी नागपूरहून राज्य आपत्ती निवारण दलाचे दोन चमू दाखल झाले असून बोटेद्वारे तिघींचाही शोध सुरु आहे. पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी तसेच गावकरी नदीकाठी ठाण मांडून आहेत.