शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:51 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले.

ठळक मुद्देआष्टी परिसर । अनेक ठिकाणी कवेलू, टिनपत्रे उडाली; वीज खांब तुटल्याने पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले. परिणामी या भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरात शुक्रवारी ३ वाजतापासून अचानक वादळ आले. वादळवाऱ्यासह पावसालाही सुरूवात झाली. या परिसरात कुनघाडा, ठाकरी, चपराळा, चौडमपल्ली, मार्र्कं डा (कं.) आदी गावातील अनेक नागरिकांच्या घराच्या कवेलू उडाल्या. तसेच टिनपत्रे उडाले. कवेलू घर परिसरात पडल्याने ते फुटले. याशिवाय घराच्या छतावरील फाटेही अस्ताव्यस्त झाले. काही ठिकाणी विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. दुसºया दिवशी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वीज दुरूस्तीचे काम सुरूकेले. परंतु एका दिवसाचे हे काम नसल्याने नागरिकांना दुसºया दिवशीही रात्र अंधारातच काढावी लागली.चपराळा येथील काही नागरिकांच्या घरावरील कवेलू वादळवाºयाने उडाले. तसेच टिनपत्रे खाली कोसळले. सिमेंट पत्रे उडून खाली पडून फुटले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. वादळीवाºयासह पाऊस आल्याने अनेक नागरिकांच्या मातीच्या घराच्या भिंती कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना रात्रभर प्रचंड त्रास सहन करावा लागला. या भागात अनेक शेतकºयांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले. सध्या आंब्यात कठीण कोई निर्माण होण्याचा कालावधी आहे. याच कालावधीत अनेक नागरिक आंब्याचे लोणचे टाकतात. परंतु वादळवाºयाने बहुतांश झाडावरील निम्म्यापेक्षा अधिक आंबे खाली गळून प्रचंड नुकसान झाले. चपराळा येथील मनोहर आदे, पत्रू निकोडे, कल्पना मेश्राम, ईश्वर आदे यांच्या घरावरील कवेलू तसेच टिन वादळाने उडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाचा जोरदार फटका या परिसराला बसला.पंचनामे करण्याची मागणीआष्टी परिसरातील आठ ते दहा गावाला शुक्रवारच्या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. मातीच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे झोपडीवजा घरे असलेल्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. गवताच्या झोपड्यांवरील गवत वादळाने उडाले. नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई के व्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊस