शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड व कढोली बंधारे पूर्ण होणार काय?

By admin | Updated: November 3, 2014 23:26 IST

कढोली व वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम अपूर्ण राहीले आहे. नवीन सरकारने सदर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

वैरागड : कढोली व वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम अपूर्ण राहीले आहे. नवीन सरकारने सदर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कढोलीजवळून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात मोठ्या पुलाच्या खालील भागात २००८-०९ या आर्थिक वर्षात शिवकालीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत बंधारा निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर २००९- १० या आर्थिक वर्षात वैरागड येथील पाणी पुरवठा विहीरीच्या खालील भागात शिवकालीन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या दोनही बंधाऱ्यांचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकाम अपूरे असल्याने पुरेसे पाणी साचून राहत नाही. बंधाऱ्याची उंची केवळ ३ फुट असल्याने बरेचशे पाणी बंधाऱ्यावरून वाहून जाते. बंधाऱ्यामुळे काही प्रमाणात नेहमीच पाणी साचून राहत असल्याने नदीपात्राच्या दोनही किनाऱ्यांवर दगडांची पिचिंग करणे आवश्यक होते. मात्र हे बांधकाम झाले नसल्याने नदीपात्र खचत चालला आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस विस्तारत चालले असून यामुळे सभोवतालची शेती धोक्यात आली आहे. शिवकालीन बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश नदी- नाल्यामधून वाहून जाणारे पाणी अडवून सभोवतालच्या परिसरातील भूजलाच्या पातळीत वाढ करणे हा आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासू नये यासाठी या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र चुकीचे नियोजनामुळे बंधारे बांधकामाचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावर झालेला लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. नवीन सरकारकडून या बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.