शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्षात व्यापणार का संपूर्ण जिल्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 23:24 IST

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही.

गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून मानव-वन्यजीव संघर्षाला जोरदार सुरुवात झाली. याच महिन्यात जिल्ह्यातील पहिला बळी वाघाने घेतला. त्यानंतर गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाघांनी ४३ तर, बिबट्यांची ५ लोकांचा बळी घेतला. यात गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक २५ लोकांचा समावेश आहे. हे हल्ले केवळ गडचिराेली व वडसा वनविभागातच झाले नाही तर बिबट्यांनी आलापल्ली, सिराेंचा वनविभागातही लाेकांचा बळी घेतला. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात संपूर्ण जिल्हा व्यापणार काय, असा प्रश्न आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाली तेवढी कधीच झाली नाही. अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडल्या असाव्यात. गत चार वर्षांपासून सुरू झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षानंतर वाघांचा वावर असलेल्या गावांमध्ये रोजंदारीवर देखरेख व कृती पथक गठित करण्यात आले. वन विभागातर्फे सदर पथक लोकांमध्ये जागृती करीत आहे; परंतु वाघांचे हल्ले व बळी जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही घटना जंगलात तर काही घटना अगदी शेतात व शेतशिवारात घडल्या. यातच देसाईगंज व भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला वन विभागाने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी जेरबंद केले.

ती वाघिण केव्हा हाेणार जेरबंद?गडचिरोली तालुक्यातील ७ लोकांचा बळी घेणारी टी-६ वाघीण अद्याप जेरबंद झाली नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे वन विभागापुढे आव्हान आहे. हल्लेखोर वाघ वेळीच जेरबंद न झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अस्वलांनीही घेतले अनेक बळीगडचिराेली जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत अस्वलांचीही आहे. जिल्ह्यातील सर्वच वन विभागात अस्वलांचा वावर आहे; परंतु जीवितहानीच्या घटना भामरागड, आलापल्ली व सिराेंचा वनविभागात अधिक घडल्या आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामात हे हल्ले हाेतात. २२ जून २०२२ राेजी एटापल्ली तालुक्यातील बटेर येथील एका नागरिकाला अस्वलाने ठार केले हाेते. विशेषत: चामाेर्शी, मुलचेरा, काेरची, आरमाेरी तालुक्यात अस्वलांचे हल्ले झाले असून त्यात अनेकजण जखमी झाले.

आलापल्ली वन विभागात शिकारीचा धाेकागडचिराेली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या सर्वाधिक शिकारी आलापल्ली वन विभागात झाल्या आहेत. वन विभागाच्या कारवाईवरून हे प्रकार उघडकीसही आले आहेत. विद्युत प्रवाह तसेच फासे लावून ही शिकार केली जाते. यापासून वाघ, बिबट तसेच चितळ, सांबर व रानटी डुकरेसुद्धा सुटली नाहीत.

 

टॅग्स :Tigerवाघ