संसदेत २१२ प्रश्नांची यादी सादर : अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहितीगडचिरोली : रेल्वे मार्ग, सिंचन प्रकल्प तसेच उद्योग हे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागास गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार नाही. हे हेरून आपण मंगळवारच्या अर्थसंकल्पीय बजेटसाठी २१२ प्रश्नांची यादी संसदेत सादर केली आहे. मुख्यत: रेल्वे मार्ग, सिंचन व उद्योगाचा प्रश्न मार्गी लावणार, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माहिती देताना खासदार नेते म्हणाले, गडचिरोली-वडसा हा ४९.०५ किमी लांबीचा रेल्वेमार्ग निधीअभावी गेल्या पाच वर्षापासून रखडला होता. सदर रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण सदर प्रश्न संसदेत सादर केला आहे. या उपरही नागभिड येथे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्याची बैठकही घेतली. या रेल्वे मार्गाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहमती दर्शविली आहे. तसे आश्वासनही त्यांनी मला दिले आहे. या रेल्वे मार्गाला एकूण ४६९ कोटी रूपये लागणार आहे. केंद्र शासनाकडून या रेल्वे मार्गाला या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये निधीची तरतूद झाल्यानंतर राज्य सरकारला आपला ५० टक्के वाटा उचलावाच लागेल. यामुळे हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल. वनकायद्यामुळे जिल्ह्यातील तुलतुली, कारवाफा, चेन्ना व इतर असे एकूण २२ सिंचन प्रकल्प रखडले आहेत. सदर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आपण संसदेत केली आहे. वैनगंगा नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्नही सोडविणार असल्याचे खासदार नेते यावेळी म्हणाले,यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, अनिल पोहनकर, गजानन येनगंदलवार, अनिल करपे, डेडू राऊत आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
रेल्वे, सिंचनाचा प्रश्न सोडविणार
By admin | Updated: July 6, 2014 23:54 IST