सिरोंचा : आदिवासी विद्यार्थी संघाच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र व तेलंगणा सरकारने मेडीगट्टा- कालेश्वर सिंचन प्रकल्पाची उंची तीन मिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नंतरही या सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याला नुकसानीची झळ पोहोचणार असल्याने आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी आ. दीपक आत्राम यांच्या नेतत्त्वात अहेरी येथे मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सोेमवारी सिरोंचा येथील विश्रामगृहात आविसंचे नेते माजी आ. दीपक आत्राम यांनी मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाच्या विषयावर कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. यावेळी तेलंगणा सरकारच्या श्रवंती- चव्हेला सिंचन प्रकल्पामुळे होणाऱ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मेडीगट्टा- कालेश्वर व श्रवंती- चव्हेला सिंचन प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार, आविसंचे अध्यक्ष बनय्या जनगम, रवी सल्लम, मंदा शंकर, कुम्मरी सडवली, श्याम बेज्जनवार, जानकी सीनु, मारोती गणपुरापू, रवी बोनगोनी, ओंकार ताटीकोंडावार, रवी सुलतान, रवी दुग्याला महेश पोककुरी, संजीव पेदापल्ली, पानेम राजन्ना, नारायण मुडमडीगेला, दुर्गम सरय्या, दुर्गम बापू, दिकोंडा श्रीनिवास, लांबडी दुर्गेश आदी हजर होते. (शहर प्रतिनिधी)
आविसं पुन्हा आंदोलन करणार
By admin | Updated: March 29, 2016 02:43 IST