शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:53 IST

गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेली चामोर्शी तालुक्याच्या घोट येथे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मात्र या शाळेच्या वनजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभिर्याने दखल घेतली असून प्रत्यक्षात पाहणी केली.

ठळक मुद्देसर्वेक्षण सुरू : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेली चामोर्शी तालुक्याच्या घोट येथे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मात्र या शाळेच्या वनजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभिर्याने दखल घेतली असून प्रत्यक्षात पाहणी केली. त्यांच्या निर्देशानंतर येथे वन जमीन सर्वेक्षणाच्या कामास प्रारंभ झाला आहे.घोट येथे नवोदय जवाहर विद्यालय झाल्याने गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर आले. तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी केंद्रीय विद्यालयाची संकल्पना मांडली. त्यांच्या पुढाकाराने एससी, एसटी व इतर मागास विद्यार्थ्यांसाठी घोट येथे १९८६-८७ या वर्षात जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. येथे इयत्ता सहा ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून सद्य:स्थितीत ४६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व मिळून ४० कर्मचारी कार्यरत आहेत. सदर शाळेला वन जमीन मिळविण्यासाठी १० वर्षापूर्वी १ कोटी ३३ लाख रुपये भरण्यात आले होते. मात्र वनकायदा आड येत होता. परिणामी येथील बांधकामे थंडबस्त्यात राहिली. अलिकडेच सदर शाळेतील शिक्षक ओमप्रकाश साखरे व पालकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानंतर १५ जुलैला जिल्हाधिकारी सिंह यांनी सदर शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून जागेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर येथून सर्वे करणारे ३० कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी इमारत व रस्ता बांधकामाबाबत जागेचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा