शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींचे खांदेपालट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:10 IST

गडचिरोली नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक २३ जानेवारी रोजी होत आहे. या नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे. सर्वच सदस्यांना पदे मिळतील, असे आश्वासन भाजप श्रेष्ठींकडून मागच्या वर्षीच देण्यात आले होते.

ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : पक्षश्रेष्ठी ठरविणार सभापती;सदस्यांमध्ये उत्सुकता कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक २३ जानेवारी रोजी होत आहे. या नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे. सर्वच सदस्यांना पदे मिळतील, असे आश्वासन भाजप श्रेष्ठींकडून मागच्या वर्षीच देण्यात आले होते. त्यामुळे सभापतीपदांची खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही सदस्यांनी वरिष्ठांकडे मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.गडचिरोली नगर परिषदेत एकूण २५ सदस्य संख्या आहे. त्यापैकी २१ नगर सेवक भाजपाचे निवडून आले होते. निवडणुकीनंतर २ अपक्ष सदस्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता भाजपच्या सदस्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. विरोधी पक्षाचे केवळ २ सदस्य आहेत. भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने मागील वर्षी सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान प्रत्येक सदस्याला एक वर्षासाठी सभापती बनविले जाईल, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा सभापतीपद मिळणार नाही, याची शाश्वती असल्याने त्यांनी सभापती पदाच्या आशा सोडल्या आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोणाला कोणते पद द्यायचे ही संपूर्ण जबाबदारी पक्ष श्रेष्ठींवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजुनपर्यंत सभापतीपद ठरले नसल्याची माहिती नगरसेवकांनी दिली तर काहींनी मात्र शनिवारी सकाळी जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला काही निवडक सदस्यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली आहे.सभापती पदाच्या निवडीत पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा असला तरी बांधकाम सारखे वजनदार सभापतीपद मिळावे, यासाठी सद्यस्थितीत नगर परिषदेचे सदस्य असलेल्यांनी आपण कशी महत्त्वपूर्ण जबाबदारी पाडू, हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते व पक्षश्रेष्ठींकडे केला जात आहे.बांधकाम सभापती पदासाठी चुरसनगर परिषदेमध्ये बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, शिक्षण सभापती, वित्त व नियोजन सभापती, महिला व बालकल्याण सभापती ही चार पदे राहतात. त्यापैकी बांधकाम सभापती हे वजनदार पद मानले जाते. त्यामुळे हे सभापतीपद भूषविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. या पदासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याचे दिसून येते.गडचिरोली नगर परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाच यशोधरा उसेंडी या बांधकाम सभापती बनल्या होत्या. त्यानंतर या पदावर पुरूष सदस्यांचीच मक्तेदारी राहिली आहे. आता नगर परिषदेत जवळपास ५० टक्के महिला सदस्य असल्याने बांधकाम सभापतीपदावर किमान आतातरी महिला सदस्याची वर्णी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.