शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा हल्ला : चार वर्षात १०७ नागरिक जखमी- १३ जणांचा बळी

By admin | Updated: November 22, 2014 01:14 IST

७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

गडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सन २०१०-११ ते २०१३-१४ या चार वर्षात वन्यप्राणी हल्ल्यांच्या एकूण १३ घटना घडल्या असून यात १३ नागरिकांचा बळी गेला आहे. तर १०७ नागरिक जखमी झाले आहेत. गडचिरोली वनवृत्तांतर्गत गडचिरोली, वडसा, आलापल्ली, सिरोंचा व भामरागड हे पाच वनविभाग आहेत. गडचिरोली या वनव्याप्त जिल्ह्यात एकूण २९ प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये बिबट, अस्वल, रानम्हैस, चितळ, भेडकी, सांबर, हरिण, काळविट, निलघोडा, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, तळस, ससा, निलगाय, रोही, माकड, चौसिंगा, बेलमांजर, रानकुत्रा, सारस, रानगवा, मुंगूस, गिधाड, मोर, शेकरू व रानकोंबडी आदींचा समावेश आहे. गडचिरोली वनविभागाच्या तुलनेत आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वनविभागाच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचे संख्या अधिक आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०१०-११ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे एक प्रकरण घडले. यात एका व्यक्तीचा बळी गेला असून २४ व्यक्ती जखमी झाले. २०११-१२ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे तीन नागरिकांचा बळी गेला असून २२ ननागरिक जखमी झाले. सन २०१२-१३ या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे ९ प्रकरण झाले असून यात ९ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक ५० नागरिक जखमी झाले होते. सन २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १० नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने पंचनामा करण्यात येतो. त्यानंतर आर्थिक मदतीसाठी सदर प्रस्ताव वनवृत्त कार्यालयाला पाठविल्या जातो. सन २०१०-११ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतक व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत २ लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २५ जखमी व्यक्तींना ६ लाख २ हजार ७८ रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सन २०११-१२ या वर्षातील ३ मृतक व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ६ लाख रूपयाची मदत देण्यात आली आहे. तर याच वर्षातील २२ जखमींना ५ लाख ४० हजार ७०१ रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१२-१३ या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या ९ मृतकांच्या कुटुंबियांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. याच वर्षात जखमी झालेल्या ५० नागरिकांना १३ लाख ५० हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे. २०१३-१४ या चालू वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील १० नागरिकांना ६ लाख रूपयाची आर्थिक मदत वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)