शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शंकरनगरात पुन्हा रानटी हत्तींचा धुडगूस; मक्याची नासधूस, दीड महिन्यानंतर एन्ट्री

By गेापाल लाजुरकर | Updated: February 16, 2024 11:44 IST

डिसेंबर २०२३ मध्ये आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे रानटी हत्तींच्या कळपाने महिला शेतकऱ्याचा बळी घेतला होता.

गडचिरोली : डिसेंबर २०२३ मध्ये आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे रानटी हत्तींच्या कळपाने महिला शेतकऱ्याचा बळी घेतला होता. त्यानंतर कुरखेडा व देसाईगंज तालुक्यात गेलेला हत्तींचा कळप तब्बल दीड महिन्यानंतर पुन्हा शंकरनगर येथे परतला. या कळपाने १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शंकरनगरातील आठ शेतकऱ्यांच्या मका व कारले पिकाची नासधूस केली.

मका पिकाला कणसे येत असल्याने शेतकरी दिवसा पिकांची राखण करीत आहेत. या परिसरात सध्या हत्तींचा वावर असल्याने रात्रीची जागल शेतकऱ्यांनी बंद केली. दरम्यान १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २२ च्या संख्येत असलेला रानटी हत्तींचा कळप शंकरनगर परिसरात दाखल होऊन निरंजन हलदार, रविन बाला, सुजय विश्वास, बिधान मंडल, निर्मल मिस्त्री, गौरंग मिस्त्री, कृष्णा माझी, समीर विश्वास आदी शेतकऱ्यांच्या मका पिकाची नासधूस केली. मका आणि कारले पिकांत अक्षरशः तांडव घातला. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्ये शंकरनगरातील एक महिलेला रात्री शेतातच चिरडून ठार केले होते. तेव्हापासून शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली होती. आता पुन्हा हत्तींनी एन्ट्री केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.