शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जंगली हत्ती परतीच्या वाटेवर? टिपागड पहाडी परिसरात फिरताहेत कळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 21:30 IST

सदर जंगली हत्ती रात्रीच्या सुमारास गांगसायटाेला, तलवारगड व येरमागड परिसरात येऊ शकतात, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जंगली हत्तींचा कळप जेव्हा गडचिराेली जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या जंगल भागातून आला हाेता, आता हाच कळप काेरची तालुक्यातील जंगल परिसरात पाेहाेचला आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून हत्तींचा हा कळप पुढे- पुढे जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कधानाेरा : ओदिशा राज्यातून गडचिराेली जिल्ह्यात पाेहाेचलेल्या जंगली हत्तींचा कळप महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमा क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हत्तीचा हा कळप गाेंदिया जिल्ह्यात पाेहाेचला हाेता. तिथून पुन्हा गडचिराेली जिल्ह्याच्या कारेची तालुक्यात पाेहाेचला. रविवारी सायंकाळच्या सुमारास हत्तींचा हा कळप धानाेरा तालुक्यातील  टिपागड पहाडी परिसरातील गांगसाय, हुऱ्यालदंड या परिसरात पाेहाेचला आहे. दरम्यान, सदर जंगली हत्ती रात्रीच्या सुमारास गांगसायटाेला, तलवारगड व येरमागड परिसरात येऊ शकतात, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जंगली हत्तींचा कळप जेव्हा गडचिराेली जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या जंगल भागातून आला हाेता, आता हाच कळप काेरची तालुक्यातील जंगल परिसरात पाेहाेचला आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून हत्तींचा हा कळप पुढे- पुढे जात आहे. गतवर्षीसारखा हा हत्तींचा कळप आता ओडिसा राज्यात परत जाईल, असा अंदाज या भागातील नागरिक करीत आहेत. दरम्यान, फिरत असलेले हे जंगली हत्ती रस्त्यालगतच्या धान पिकाच्या शेतीत धुडघूस घालत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे. सध्या धान पीक शेवटच्या टप्प्यात असून, पंधरा ते वीस दिवसांनंतर जड प्रतिच्या धानाची कापणी हाेणार आहे. मात्र, हत्तींमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

वन कर्मचाऱ्यांच्या चमुची नजर-    हत्तींचा कळप धानाेरा वन विभागातील टिपागड पहाडी परिसरात पाेहाेचला आहे. मालेवाडा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मात्र काेरची तालुक्यातील जंगलात हत्ती फिरत आहेत. या हत्तींवर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर आहे. पथक पूर्ण लक्ष ठेवून आहे.

नुकसानभरपाई केव्हा मिळणार?-    गेल्या वर्षीसुद्धा हत्तींच्या कळपाने शेतातील पिकांचे माेठे नुकसान केले. यापाेटी पंचनामे व सर्वेक्षण झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तब्बल २३ लाखांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली हाेती. यंदाही हत्तींनी पिकांचे नुकसान केली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

 प्रतापगडमध्ये घर व धान पुंजण्याचे नुकसान -    यापूर्वी बुधवारला जंगली हत्तींच्या या कळपाने काेटगूल क्षेत्रातील येडजार गावातील एका शेतकऱ्याचे धानाच्या पुंजण्याचे नुकसान केले, तसेच गांगीण गावातील पाच घरांचे नुकसान केले हाेते. दरम्यान, त्यावेळी ग्रामस्थांनी हत्तींना पळवून लावण्यासाठी फटाके फाेडल्यानंतर हत्ती तेथून निघून गेले.-    काही दिवसांपूर्वी बेडगाव घाटाजवळ दुचाकीने काेरचीकडे येत असलेल्या एक व्यापारी व त्यांचा मुलावर हत्तींनी हल्ला केला. यात अपघात झाल्याने ते दाेघे जण किरकाेळ जखमी झाले हाेते. दरम्यान, तेव्हापासून बेडगाव परिसरातील नागरिक जागरूक झाले हाेते.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग