शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

मका मोडला, धान गाडले; गहू, चन्यालाही मातीमोल केले!

By गेापाल लाजुरकर | Updated: March 1, 2024 19:09 IST

अतोनात नुकसान : अरततोंडी परिसरात रानटी हत्तींचा धुडगूस.

गडचिरोली : देसाईगंजच्या पूर्वेकडील गावांच्या शेजारी असलेल्या जंगलात रानटी हत्तींनी गेल्या महिनाभरापासून ठाण मांडल्याने शेतशिवारातील त्यांचा वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या रब्बी पिके शेतात आहेत. दिवसभर जंगलात राहणाऱ्या हत्तींनी २९ फेब्रुवारीच्या रात्री आपला अरततोंडी येथील शेतशिवाराकडे मोर्चा वळवून मका मोडला, धान बांध्यांत गाडले, गहू चन्यालाही मातीमोल केले. त्यामुळे शेतकऱ्यांसह वनविभाग देखील हतबल झाला आहे.

सध्या शेतकऱ्यांनी मका, धान, गहू, चना, उडीद, मूग तसेच विविध भाजीपाला व इतर कडधान्य पिकांची लागवड केली आहे. यातील काही पिके आता काढणीस आली आहेत. परंतु २९ फेब्रुवारीच्या रात्री तर हत्तींच्या कळपाने कहरच केला. वडसा वनपरिक्षेत्र अंतर्गत पळसगाव-डोंगरगाव (ह.) वनक्षेत्र क्रमांक ८४, ८५ मध्ये दिवसा हत्तींचा मुक्काम होता. त्याच रात्री अंदाजे ९:३० वाजेच्या दरम्यान महादेव पहाडीमार्गे अरततोंडी गावाला लागून असलेल्या शेतशिवारात हिरव्याकंच मका पिकांवर ताव मारत नासधूस केली. सोबतच धानपिके, चना, गहू, उडीद व अन्य पिके देखील तुडविली. तोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली. बारा शेतकऱ्यांचे पीक तुडविले.रानटी हत्तींनी १२ शेतकऱ्यांच्या पिकांत धुडगूस घालून नुकसान केले. लता नंदेश्वर यांच्या दोन एकर शेतातील मका हत्तींनी जमिनीत गाडला. शिवाय गहू व धानपीक देखील कळपाने तुडविले. मारोती शेंडे यांचे धान, चना व उडीद पिके नेस्तनाबूत केली. चरणदास कोल्हे यांचे धान व बरबटीचे पीक होत्याचे नव्हते केले. वच्छला भुते यांचे मका पीक तर कुसन नंदेश्वर यांच्या धान पिकाला मातीमाेल केले. क्षेत्रसहायक म्हणतात, पंचनामे करूरानटी हत्तींनी डोंगरगाव (ह.) येथील काही शेतकऱ्यांच्या पिकाची सुद्धा नासधूस केली. याबाबत विहीरगाव वनक्षेत्राचे क्षेत्रसहायक कैलास अंबादे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येतील व नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली