शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

सौर कृषीपंप घेण्यासाठी अनुदान मिळूनही शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:59 IST

अनुदान मिळूनही उदासीनता : वीज पंप वापरण्याकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : आरमोरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करीत असतात. दरम्यान, शेतकऱ्यांना शेती सिंचन सोयीसाठी कृषीपंपाची आवश्यकता असते; मात्र शासनाकडून ५ ते १० टक्के सबसिडी मिळत असली तरी अनेकजण आपल्या शेतामध्ये सौर कृषीपंप घेण्यासाठी नकार देत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी नदी, नाले, विहीर किंवा बोअरच्या साह्याने पाण्याची सोय शेतीला करीत असतात अशावेळी शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता भासत असते; पण वीज वितरण कंपनी मात्र वीज कनेक्शन देण्याऐवजी सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना देत आहे; परंतु शेतकरी सौर ऊर्जा पंप घेण्यास पूर्णपणे नकार देत आहेत. सौर कृषिपंप नको, वीज कनेक्शन द्या, अशी मागणी या भागातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

कृषी पंपासाठी वीज कनेक्शनची मागणी

  • इलेक्ट्रिक पंपाव्दारे पाणी शेतीला मुबलकपणे पाणी देऊ शकतो, तसे सौर ऊर्जा पंपाचे पाणी मुबलकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे ही एक समस्या शेतकऱ्यांसमोर उद्भवत असते.
  • शेतकऱ्यांचा सौर ऊर्जा पंपाला नकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

का नको सौर कृषी पंप ?

  • जिल्ह्याला लागूनच मोठी नदी वैनगंगा आहे व तिला जोडूनच अनेक उपनद्या आहेत, वैनगंगा नदीला गोसीखुर्द सारखे एक मोठे धरण आहे.
  • तर उपनद्यांना इंडियाडोह सारखे प्रकल्प आहेत त्यामुळे पावसात अतिवृष्टीने धरणाचे पाणी सोडत असतात अशावेळी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर धानाची शेती पाण्याखाली जात असते तेव्हा सौर ऊर्जा पंप सुद्धा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत असतात.
  • एखादा सौर पंप पाण्याखाली बुडला की तो पाण्यामुळे निकामी होतो तो पंप दुरुस्ती होईल याची शाश्वती नसते त्यामुळे अनेक शेतकरी सौर पंप घेण्यास धजावत नाहीत.
  • इलेक्ट्रिक पंप असला तर पूर परिस्थितीत पंप पाण्याखाली गेला तरी ऑटोमॅटिक लाईन ट्रिप होऊन फ्यूज जात असते, त्यामुळे इलेक्ट्रिक पंप शेतकऱ्यांना सोयीस्कर व सुरक्षित वाटतो.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली