लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर गुरूवारी (दि.२३) रोजी तब्बल दीड महिन्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अंतिम निकालानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण याचा फैसला होणार असून मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे. आज सकाळी ८ वाजतापासून भंडारा येथील लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात मतमोजणी होणार असून याकडे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना पंचबुध्दे, भाजपचे सुनील मेंढे, बसपाच्या डॉ. विजया नंदूरकर यांच्यासह १४ जणांनी भाग्य अजमाविले. १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६८.२७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील २१८४ मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे आणि भाजपाचे सुनील मेंढे यांच्यात थेट लढत झाली. कोण विजयी होणार याचा शेवटपर्यंत कुणालाही अंदाज बांधता आला नाही.दोन्ही पक्षाचे समर्थक मात्र आपल्या उमेदवाराच्या विजयाची पक्की खात्री देत आहेत. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रांरभ होणार आहे. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून विजयी जल्लोषासाठी दोनही पक्षाचे कार्यकर्ते तयार असल्याचे दिसत आहे.
मतदारसंघाचा खासदाराचा कोण ठरणार आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:17 IST
१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर गुरूवारी (दि.२३) रोजी तब्बल दीड महिन्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अंतिम निकालानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण याचा फैसला होणार असून मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे.
मतदारसंघाचा खासदाराचा कोण ठरणार आज
ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार। सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष