शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:16 IST

तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईचे संकट : लोकसंख्येच्या तुलनेत जलस्त्रोत कमी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पांढरसडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. गावातील लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठ्याची ही साधने कमी आहेत. त्यामुळे हातपंप खोदून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असली तरी जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे गावातील महिला व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावातील दोन्ही विहिरी एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच आटल्या. परिणामी गावातील महिलांची हातपंपावर गर्दी दिसून येते. हातपंपांना सुध्दा कमी प्रमाणात पाणी येत असल्याने हातपंपावर भांडे व महिलांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येते. पाणी भरण्यासाठी अर्धा तासानंतर नंबर लागत असल्याने कित्येक वेळ हातपंपावरच प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने पहाटेपासूनच गावातील विहिरींवर महिलांची गर्दी होते. सकाळीच विहिरीतील पाणी पूर्णपणे संपते. या गावात प्रत्येक कुटुंबांकडे जनावरे आहेत. बाहेरचे पाण्याचे स्त्रोत आटल्याने जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.पाणी टंचाईबाबात खुटगाव ग्रामपंचायतीचे सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, विहिरीला दगड लागला आहे. त्यामुळे पुन्हा विहिरीचे खोलीकरण करणे शक्य नाही, अशी माहिती दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई