शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे... 'आयुष्यमान' नाव रेखाटतानाच तुटली आयुष्याची दोरी; चित्रकाराचा मृत्यू

By संजय तिपाले | Updated: December 29, 2023 14:12 IST

बोटेकसाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

गडचिरोली : नियतीचा खेळ कधी कुणाला कळलायं?, जीवन- मृत्यूचा सारा प्रवास अनिश्चित. कोरची तालुक्यात २८ डिसेंबरला एका घटनेने याची पुन्हा एकदा प्रचिती आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर 'आयुष्यमान' हे नाव रेखाटताना सज्जा तुटल्याने उंचावरुन कोसळल्याने चित्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनाला चटका लावणारी ही हृदयद्रावक घटना बोटेकसा येथे घडली.

सुरेश तुकाराम कराडे (वय ५५, रा. वॉर्ड क्र.७, कोरची) असे मयताचे नाव आहे. ते चित्रकार म्हणून तालुक्यात परिचित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रांना पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव होते ते बदलून आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नामकरण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, २८ डिसेंबर रोजी बोटेकसा येथे  प्राथमिक आरोग्य इमारतीवर आयुष्यमान आरोग्य मंदिर हा नामफलक लावयचा होता. त्यासाठी चित्रकार सुरेश कराडे हे दोरीच्या सहाय्याने इमारतीच्या दर्शनी भागावरील सज्जावर पोहोचले व तेथे नाव रेखाटू लागले.

याचवेळी सज्जा तुटला व ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.  डॉ.राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून  जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पश्चात  पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी सुरेश कराडे यांच्या मूळगावी कोचीनारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निकृष्ट बांधकाम, कंत्राटदारावर गुन्हा नोंदवावा

कोरचीपासून १२ किलोमीटरवरील बोटेकसा  येथे २०१६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली होती. या इमारतीच्या दर्शनी भागावरील सज्जा तुटल्याने चित्रकार सुरेश कराडे यांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कराडे यांच्या नातेवाईकांनी करणाऱ्या कंत्राटदारासह बांधकाम अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.