शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आॅईल इंजीनसाठी रॉकेल आणायचे कोठून?

By admin | Updated: August 31, 2015 01:16 IST

समाज कल्याण व कृषी विभागामार्फत दरवर्षी सबसिडीवर शेतकऱ्यांना आॅईल इंजीनचा पुरवठा केला जातो.

शेतकऱ्यांचा सवाल : कृषी व समाज कल्याण विभाग पुरवितो इंजीनगडचिरोली : समाज कल्याण व कृषी विभागामार्फत दरवर्षी सबसिडीवर शेतकऱ्यांना आॅईल इंजीनचा पुरवठा केला जातो. हे आॅईल इंजीन ग्रामीण भागात शेतकरी रॉकेलच्या माध्यमातून चालवितात. परंतु शेतकऱ्यांना यासाठी रॉकेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सरकार आॅईल इंजीन पुरविताना रॉकेलसाठीची व्यवस्था गावनिहाय का करून देत नाही, असा सवाल चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांनाही निवेदन पाठविले असून शेतकऱ्याच्या या प्रश्नाची सोडवणूक सरकारी यंत्रणेने करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या वनकायद्यामुळे अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत पडून आहे. चिचडोह बॅरेज वगळता नवीन सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला पावसाच्या भरवशावर शेती करावी लागते. काही शेतकरी गावालगतच्या नदी व तलावावरून पाण्याचा उपसा आॅईल इंजीनमार्फत करतात. त्यामुळे दरवर्षी कृषी व सामाजिक न्याय विभाग आॅईल इंजीन पुरवठ्यासाठी लाखो रूपयाच्या निधीची तरतूद करते. हे आॅईल इंजीन डिझेलवर चालवावे, अशी सरकारी यंत्रणांची भूमिका आहे. मात्र गावात सहजपणे डिझेल मिळत नाही. त्यामुळे केरोसीनचा वापर आर्थिकदृष्ट्याही परवडणारा असल्याने शेतकरी करतात. परंतु आता केरोसीन पुरवठ्यावरही बंधन आणले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना केरोसीन मिळत नाही. त्यामुळे शेतीओलीताच्या कामावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शासनानेच आॅईल इंजीनधारक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र केरोसीनचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)