शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्हा केव्हा निर्माण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:21 IST

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्रातील लोकांसह राजकीय पुढाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांना प्रतीक्षा : सरकारकडून जिल्हा निर्मितीची घोषणा अद्यापही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्रातील लोकांसह राजकीय पुढाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र ही मागणी अद्यापही शासनदरबारी धूळ खात पडली आहे. विद्यमान सरकारने अहेरी जिल्हा निर्मितीची अद्यापही घोषणा केली नाही. तशा सरकारकडून सकारात्मक हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्माण केव्हा होणार, असा सवाल अहेरी भागातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, विविध सामाजिक संघटना व अनेक राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेकदा जिल्हाभर आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी उपोषण, धरणे आंदोलन करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आंदोलनाची दखल विद्यमान सरकारने अजुनही घेतली नाही. अहेरी जिल्हा निर्मितीच्या संदर्भात घडामोडी सुरू असल्या तरी विद्यमान सरकार अहेरी जिल्हा निर्मितीबाबत सकारात्मक आहे, अशी परिस्थिती आजपर्यंत निर्माण झाली नाही. असे असताना सुध्दा गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी जिल्हा निर्मितीबाबतची चर्चा अहेरी व सिरोंचा परिसरात गेल्या अनेक दिवस सुरू होती. सन २०१७ च्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभपर्वावर शासनाकडून अहेरी जिल्हा निर्माण करून अहेरीसोबत राज्यातील अन्य काही जिल्हे निर्माण केले जाणार आहेत. अशी चर्चा संपूर्ण परिसरात सुरू होती. मात्र ही चर्चा अफवा ठरली. कारण त्यावेळी अहेरी जिल्हा निर्मितीसह कोणत्या जिल्हा निर्मितीची घोषणा करण्यात आली नाही. अहेरी जिल्हा निर्मिती करू, असे युती शासनाच्या पदाधिकाºयांनी निवडणुकीदरम्यानच्या जाहीरनाम्यात व प्रचारादरम्यान सांगितले होते. मात्र हे आश्वासन सत्ताधारी पदाधिकाºयांना पूर्ण करता आले नाही. अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास सिरोंचा तालुक्यातील जनतेला २१२ किमी अंतर गाठून गडचिरोली जिल्हा मुख्यालयी जावे लागणार नाही. वेळ व पैशाची बचत होईल. तसेच अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास रेगुंठा, झिंगानूर, आसरअल्ली यासारख्या दुर्गम गावांना तालुक्याचा दर्जा प्राप्त होऊ शकतो.तसेच रोजगाराची संधीही निर्माण होऊ शकते. विद्यमान सरकारने आता अहेरी जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी अहेरी उपविभागातील हजारो नागरिकांनी केली आहे.