शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

प्रेयसीने गळफास घेतल्याचे कळताच 'त्याने'ही संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 19:29 IST

Gadchiroli News प्रेयसीने गळफास घेऊन जीव दिल्याचे कळताच तिच्या प्रियकरानेही घरी जाऊन गळफास घेत जीव दिल्याची घटना चामोर्शी तालुक्यात घडली.

ठळक मुद्देअल्पवयीन युवतीसह युवकाची आपापल्या घरी आत्महत्या

गडचिरोली : शिक्षण घेण्याच्या अपरिपक्व वयात प्रेमाच्या सप्तरंगी स्वप्नांच्या दुनियेत उडणे किती धोकादायक असते याचा प्रत्यय देणारी घटना तालुक्यातील मुरखळा (माल) येथे घडली. अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकाशी प्रेम जुळले. पण वडीलांनी त्यावरून तिला रागावल्याचा तिच्यावर इतका परिणाम झाला की तिने थेट गळफास घेऊन जीवन संपविले. त्या युवतीचे ते कृत्य कळल्यानंतर संबंधित युवकानेही आपल्या घरी गळफास लावत आपल्या प्रेमाची परीक्षा दिली.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरखळा (माल) या लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे प्रेम गावातील गुराखी म्हणून काम करणाऱ्यांचा मुलगा वृषभ (२१ वर्ष) याच्याशी जुळले. वृषभ महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. २२ मार्च रोजी मुलगी घरीच फोनवर त्या युवकाशी बोलत असताना वडिलांनी ऐकले. त्यावरून त्यांनी तिची खरडपट्टी काढली. ‘असे सारखे फोनवर बोलत राहणे तुझे काम नाही, आधी व्यवस्थित शिक्षण घेणे,’ असा सबुरीचा सल्लाही तिला दिला. पण याचा तिच्या मनावर चांगलाच परिणाम झाला आणि तिने कोणताही विचार न करता आपल्या काकाच्या घरी जाऊन गळफास लावून घेतला.

अन् वृषभही चढला फासावरमुलीने गळफास लावल्याचे लक्षात येताच आरडाओरड झाली. कुटुंबीयांनी तिला लगेच चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचे वृत्त वृषभच्याही कानावर गेले. आपल्यासाठी तिने आत्महत्या केली, आता आपण जगून काय उपयोग, असा विचार करून त्यानेही आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दोन्ही घटनांची नोंद चामोर्शी पोलिसांनी घेतली असून तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जोगेश्वर वाकुडकर व विरकान साखरे करीत आहे

टॅग्स :Deathमृत्यू