शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

जनसुनवाईत काढले आरोग्य सेवेचे वाभाडे

By admin | Updated: July 3, 2014 23:34 IST

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती खस्ताहाल आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या समस्या जि. प. च्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या

आरोग्य केंद्र रडारवर : अपुऱ्या सोयी-सुविधांच्या समस्या मांडल्यागडचिरोली : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती खस्ताहाल आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या समस्या जि. प. च्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या लोकाधारित देखरेख प्रक्रियेअंतर्गत जिल्हा जनसुनवाईत मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्या अनेक मान्यवरांनी मांडून आरोग्य सेवांचे वाभाडेच काढले.जनसुनवाईला जिल्हा देखरेख व नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, डॉ. अनिल रूडे, डॉ. नितीन जाधव, अ‍ॅड. पौर्णिमा उपाध्ये, अ‍ॅड. अविला थराईल, महिला बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, पं. स. सदस्य चांगदेव फाये आदी उपस्थित होते.रूग्णालयात येणाऱ्या सर्व रूग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. अनेक डॉक्टर सरकारी रूग्णालयात सेवा न देता खासगी दवाखान्यात उपचार करतात व अतिरिक्त पैसे उकळतात. अनेक आरोग्य केंद्राच्या इमारती नादुरूस्त आहेत. अडपल्ली माल आरोग्य केंद्रात बाळतपणाला विलंब झाल्याने पाच बालमृत्यू झाले. अशा प्रकारचे अनेक विषय उपस्थितांनी जनसुनवाईत मांडले. दरम्यान मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. उंदीरवाडे, येंगलखेडा उपकेंद्रातील आरोग्य सेवक पी.बी. धोटे, मारोडा उपकेंद्रातील आरोग्य सेविका सोनी भटकर, पोटेगावचे डॉ. म्हशाखेत्री, देऊळगाव आरोग्य केंद्रातील डॉ. सुरेश दामले यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनसुनवाईत रूग्णांकडून पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, सरकारी दवाखान्यात आलेल्या रूग्णास खासगी रूग्णालयात पाठविले जाणार नाही. आरोग्य संस्थांची कामे खुल्या पद्धतीने करणे, आदी निर्णय घेण्यात आले. प्रास्ताविक मनोहर हेपट तर संचालन शुभदा देशमुख यांनी केले.