गडचिरोली : धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी या महान नेत्याला गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. आम आदमी पार्टी, गडचिरोली - स्थानिक इंदिरा गांधी चौकात बुधवारी सायंकाळी शोकसभा घेण्यात आली. यावेळी नामदेवराव गडपल्लीवार, अॅड. संजय ठाकरे, वसंत कुलसंगे, प्रा. अशोक लांजेवार, गणेश कोवे, धीरज पतरंगे, घनश्याम मुरवतकर, देवेंद्र कोरेवार, बाळकृष्ण सावसाकडे, रमेश उप्पलवार, हेमंत अंडेलकर, भांडेकर, मोरेश्वर सहारे, अनिल बाळेकरमकर, दिलीप टेकरे, मारोती बाळेकरमकर, रंजीत गोवर्धन, रक्षीत गोवर्धन उपस्थित होते. जिल्हा परिषद नर्सेस संघटना, गडचिरोली - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी नर्सेस संघटनेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा माया शिरसाट, ज्योती कांबरे, कोषाध्यक्ष कल्पना रामटेके, बेबी वड्डे, छाया मानकर, सुपारे, गोगे, वनस्कर, आसमवार, कुमरे, कोल्हेकर, हलामी, पवार, शिंदे, राठोड, अडकिते, शिलकर, मेश्राम, इतापे, गझलवार, पांडे, सुंकरवार, राजुरकर, जनबंधू, नागदेवते, महालदार, म्हशाखेत्री, चवरे, लोणारे, शिरभाते, चिमोटे, कुनघाडकर, आंकुलवार आदी उपस्थित होते. गुरूदेव सेवा मंडळ, गडचिरोली - डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत शोकसभा घेण्यात आली. त्याचबरोबर पंजाब येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, गेडाम, सोनटक्के, डॉ. बद्दलवार, निंबोरकर, राऊत, मुक्तवरम, मांडवगडे, बारापात्रे, मडावी, बी. डी. धकाते, नानाजी वाढई, श्रीहरी चौधरी आदी उपस्थित होते. संचालन पंडित पुडके यांनी केले.शहीद अजय उरकुडे स्कॉलर स्कूल, गडचिरोली - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, देसाईगंज - श्रद्धांजली कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. ए. आय. थुल, प्रबंधक तागडे, एस. एस. भुरभुरे, प्रा. भागडकर, बनपुरकर, बाळबुद्धे, वालदे, झलके उपस्थित होते. ग्राम पंचायत, तळोधी - तळोधी ग्राम पंचायतीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच माधुरी सुरजागडे, उपसरपंच किशोर गटकोजवार, ग्रामसेवक देवानंद फुलझेले, माजी उपसभापती बंडूजी चिळंगे, माधमशेटीवार, पांडूरंग दुधबावरे उपस्थित होते.
कलाम यांना जिल्हावासीयांचा सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2015 01:43 IST