लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुपारी १ वाजतानंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या फळ विक्रेत्यांकडून गडचिरोली नगर परिषदेच्या पथकाने वजनकाटे जप्त केले आहेत.औषधीची दुकाने व पेट्रोलपंप वगळता सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गडचिरोली शहरातील बहुतांश दुकानदार या नियमाचे पालन करतात. मात्र काही दुकानदार पालन करीत नसल्याचे दिसून येते. गडचिरोली नगर परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात फेरफटका मारला असता, कारगिल चौकातील भाजी विक्रेता व दैनिक गुजरीतील एका फळ विक्रेत्याने दुकान बंद केले नसल्याचे दिसून आले. यावेळी मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी दोन्ही दुकानदारांकडील वजनकाटे जप्त केले. तसेच दोन्ही दुकानदारांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश समजावून सांगितले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेले पथक सकाळपासूनच देखरेख करीत राहते. जिल्हा स्टेडीयमवर भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पालन होईल, यासाठी स्वत: मुख्याधिकारी संजीव ओहोळ सकाळपासून उपस्थित राहून पथकाला मार्गदर्शन करीत आहेत.कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सार्वजनिक स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगर परिषद प्रयत्न करीत आहे. दर दिवशी इंदिरा गांधी चौकात सोडीयम हायपोक्लोराईड मिश्रणाची फवारणी केली जात आहे.
नियम मोडणाऱ्या गडचिरोलीतील दुकानदारांकडील वजनकाटे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST
औषधीची दुकाने व पेट्रोलपंप वगळता सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गडचिरोली शहरातील बहुतांश दुकानदार या नियमाचे पालन करतात. मात्र काही दुकानदार पालन करीत नसल्याचे दिसून येते. गडचिरोली नगर परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे.
नियम मोडणाऱ्या गडचिरोलीतील दुकानदारांकडील वजनकाटे जप्त
ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : १ वाजतानंतर सुरू होती दुकाने