शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आठवडी बाजार तुरळक भरला !

By admin | Updated: June 29, 2014 23:53 IST

रस्त्याच्या मागणीसाठी गुजरी भाजी विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन सुरू करून आठवडी बाजार बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान रविवारी या गुजरी व्यापाऱ्यांच्या

भाज्या कडाडल्या : प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पोलीस बंदोबस्तात बाजार सुरूगडचिरोली : रस्त्याच्या मागणीसाठी गुजरी भाजी विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन सुरू करून आठवडी बाजार बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान रविवारी या गुजरी व्यापाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेऊन प्रशासनाने मध्यस्ती केल्यानंतर रविवारी आठवडी बाजार भरला. मात्र दूरवरचे व्यापारी आठवडी बाजारात आले नाही. यामुळे केवळ ६० ते ७० विक्रेत्यांच्या भरवशावरच तुरळक बाजार भरला. परिणामी भाज्यांचे भाव कडाडले होते.नगर परिषद प्रशासनाने गुजरी भाजी बाजारामध्ये जड वाहन ने-आण करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता निर्माण करून द्यावा, या मागणीसाठी सर्वोदय सब्जी व्यापारी असोसिएशनने २५ जून बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान मागणी कडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून शुक्रवारी दिला होता. दरम्यान, रविवारी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व गुजरी भाजी विक्रेते सकाळी १० वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात गोळा होऊन या बाजारामध्ये भाजीपाल्याचे दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांना विरोध करू लागले. जोपर्यंत गुजरीमध्ये कायमस्वरूपी रस्ता निर्माण होणार नाही. तोपर्यंत आठवडी बाजार भरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र ढाके, नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार यांनी आठवडी बाजारात येऊन गुजरी असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांची व विक्रेत्यांची समजूत घातली. पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आठवडी बाजार चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाला. मात्र रविवारच्या आठवडी बाजारामध्ये दूरवरून मोठ्या संख्येने विक्रेते आले नाही. तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकही आले नाही. त्यामुळे आठवडी बाजार नेहमीप्रमाणे गच्च भरला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)