शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

626 हेक्टरमधील गर्भावस्थेत असलेल्या धानपिकाचे झाले तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेती इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : पावसाने दडी मारल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज होती. मात्र तालुक्यातील वघाळा येथील शेतकऱ्यांना इटियाडोह  धरणाचे पाणी लागू असताना त्यांच्या पिकाला पाणी मिळाले नाही. वारंवार पाण्याची मागणी करूनही इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गर्भार असलेल्या धानपिकाला वेळेवर पाणी न मिळाल्याने या गावातील तब्बल ६२६ हेक्टर धनपिक करपून ते तणसात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आरमोरी येथील प्रकल्प कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला.यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेतीइटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील उपकार्यकारी अभियंता हे शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी भेदभाव करतात, असा आरोप करत वघाळावासीयांनी पाण्याअभावी  मेलेल्या धानाचे तणीस घेऊन आरमोरी येथील इटियाडोहचे कार्यालय गाठले. कासवी येथील उपसरपंच प्रवीण राहाटे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठाण मांडले. धान पिकाची स्थिती जाणून घेण्यासाठी देसाईगंज येथील उपकार्यकारी अभियंता मेंढे यांना राहाटे यांनी दुचाकीवर बसवून शेतकऱ्यांच्या बांधावर नेले. यावेळी मेलेल्या  धान पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली.यावेळी वघाळाचे सरपंच मिथुन प्रधान, विभागीय प्रकल्प अध्यक्ष नामदेव सोरते, सुरेश दोनाडकर, धनराज दोनाडकर, सुधाकर अलोने, रामकृष्ण धोटे, रमेश आठवले, विजय मुर्वतकार, जगन माकडे, शालू सपाटे, सतीश दोनाडकर, संतोष प्रधान, रुपेश राहाटे, अविनाश दोनाडकर यांच्यासह  माेठ्या संख्येने शेतकरी हजर हाेते.

आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या-    शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आमच्या उभ्या धानपिकाचे तणीस झाले, त्यामुळे आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या, अशी मागणी त्यांनी रेटून धरली. शेतकऱ्यांच्या या मागणीची पाटबंधारे विभागाकडून कितपत दखल घेतली जाते आणि काेणता तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० ते २५ टक्केच पाणी मिळालेइटियाडोह धरणाचे ४० टक्के पाणी गडचिरोली जिल्ह्याला देण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. यावर्षी प्रत्यक्षात २० ते २५ टक्केच पाणी जिल्ह्याला देण्यात आले. त्यामुळे वघाळा येथील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धानाचा घास इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेने हिरावून घेतल्या गेला. शेतकऱ्यांनी वारंवार पाण्याची मागणी करूनही वघाळा गावाला एकदाही पाणी मिळाले नाही. त्यामुळे वघाळा गावातील शेतकऱ्यांचे धान पिके नष्ट होऊन तणीस झाले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीItiadoh Projectइटियाडोह प्रकल्प