शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘एक रुपयाही नको, फक्त दारूबंदीची हमी द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 3:38 PM

राखीची ओवाळणी म्हणून फक्त आमच्या गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची हमी द्या,’ अशी भावनिक सादर घालत महिलांनी देसाईगंज ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.

ठळक मुद्देदेसाईगंज ठाण्यात रक्षाबंधन पोलीस दादाला मागितली अनोखी ओवाळणी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘गावात कधी चोरून लपून तर कधी उघडपणे दारूविक्र ी होत असते. याचा त्रास आया-बहिणींनाच सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत दादा आम्हाला तुमचाच आधार आहे. आम्हाला एका रुपयाही नको, राखीची ओवाळणी म्हणून फक्त आमच्या गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची हमी द्या,’ अशी भावनिक सादर घालत महिलांनी देसाईगंज ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.गुरु वारी (दि.१५) तालुक्यातील कोंढाळा, कुरु ड, कोकडी आणि विसोरा आदी गावांसह देसाईगंज शहरातील शिवाजी वार्ड, कन्नमवार वार्ड, गांधी वार्ड येथील २७ महिला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ओवाळणीचे साहित्य घेऊन देसाईगंज पोलीस ठाण्यात आल्या. गावातील दारूविक्री कायमची बंद करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. आपली ही अपेक्षा पोलिसांनी राखीच्या ओवाळणीच्या स्वरूपात पूर्ण करावी म्हणून त्यांनी पोलिसांना ‘रक्षाबंधना’त बांधून घेण्याचे ठरविले. त्यांनी उपस्थित सर्व पोलिसांना राख्या बांधल्या आणि आम्हाला ओवाळणी म्हणजे एक रुपयाही टाकू नका, पण दारूबंदी करा, असे साकडे घातले.संध्याकाळ झाली की दारूमुळे गावात भांडणे होतात. मारामाºया होतात. दारू विक्र ेते जीवे मारण्याची धमकी देतात. हे सर्व बंद होऊन सुखाने जगण्यासाठी आमच्या गावातील दारूविक्र ी बंद करा, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी ओवाळणी ठरेल, असे सांगत त्यांनी या मागणीचे लेखी निवेदनही सादर केले.यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक रोशनी गुरूकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक लांडे यांनी सर्व पोलिसांच्या वतीने दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी वचन म्हणून महिलांना दिली. पोलीस तुमच्या पाठीशी २४ तास असल्याचे सांगत विक्री बंद करण्यासाठी पोलिसांना तुमच्या मदतीची गरज असल्याचेही सांगितले. तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. पालक म्हणून त्यांना यापासून परावृत्त करणे ही कुटुंबियांची जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दारूविक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महिलांशी चर्चा करून लवकरच कृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन