दिगांबर जवादे। लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ जलसिंचन व जलसंवर्धनाची १४ हजार ८१७ कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे ६१ हजार ९०० टीसीएम पाणी क्षमता वाढली आहे. एका पाण्याने करपणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाला संजिवनी मिळत आहे. या कामांवर सुमारे २२१ कोटी ७ लाख रूपयांचा खर्च झाला आहे.तलाव व बोड्यांना नवसंजीवनीप्रत्येक गावात किमान एक मालगुजारी तलाव व बोड्या आहेत. यातील काही तलाव व बोड्या इंग्रज राजवटीतील आहेत. निर्मीतीनंतर त्यांची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे अनेक तलाव व बोड्या फुटल्या होत्या. गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बोड्या व तलाव दुरूस्ती तसेच त्यांच्यामधील गाळ काढण्याची मोहीम आखली. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे.
‘जलयुक्त’ने ६२ हजार टीएमसी पाणी क्षमता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:56 IST
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ जलसिंचन व जलसंवर्धनाची १४ हजार ८१७ कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे ६१ हजार ९०० टीसीएम पाणी क्षमता वाढली आहे.
‘जलयुक्त’ने ६२ हजार टीएमसी पाणी क्षमता वाढली
ठळक मुद्दे६१५ गावांमध्ये राबवली योजना : धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; चार वर्षात २२१ कोटी रुपये खर्च