शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीवर चढून पानठेलाधारकांची वीरूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:01 IST

शहरातील पानठेलाधारकांवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या कठोर कारवाईचा निषेध करण्यासाठी जवळपास २५ पानठेलेधारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देगडचिरोलीत आंदोलन : खर्रा विक्रीबंदी आदेशाचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील पानठेलाधारकांवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या कठोर कारवाईचा निषेध करण्यासाठी जवळपास २५ पानठेलेधारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात निदर्शने केली. दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पानठेलेधारक टाकीवरच चढून असल्याने त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. आधी रोजगार उपलब्ध करून द्या, त्यानंतरच पानठेल्यांवर कारवाई करा अशी त्यांची मागणी होती.आठ दिवसांपूर्वी नगर परिषदेने इंदिरा गांधी चौकातील पानठेलेधारकांना नोटीस बजावली होती. या चौकातच महिला रुग्णालय आहे. महिला रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेले पानठेले हटविण्यात यावे, असे नोटीसमध्ये म्हटले होते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर पानठेलाधारकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले. मात्र प्रशासन कारवाई करण्यावर ठाम आहे.पानठेलाधारकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यानंतरच पानठेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ओबीसी संघटनेचे रूचित वांढरे यांच्या नेतृत्वात शहरातील जवळपास २५ पानठेलेधारक शनिवारी दुपारी ३ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले. पाण्याची टाकी गांधी चौकातच असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. ४ वाजताच्या सुमारास पोलीस पोहोचले. त्यानंतर एसडीओ डॉ.सचिन ओंबासे, एसडीपीओ विशाल ढुमे, ठाणेदार दीपरत्न गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. पानठेल्यांवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आंदोलक टाकीवर खाली उतरेपर्यंत प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. एसडीओ डॉ.ओंबासे यांनी पानठेलाधारकांसोबत चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. समजूत घालून कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली