शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धानोरात टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:11 IST

तापमान वाढल्यामुळे धानोरा शहरातील व परिसरातील पाणीस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या अर्ध्या भागात नगर पंचायत प्रशासन तसेच पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्या पुढाकाराने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपातळी खालावल्याने पाणीटंचाईची समस्या : नगर पंचायत व नगरसेवकाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तापमान वाढल्यामुळे धानोरा शहरातील व परिसरातील पाणीस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या अर्ध्या भागात नगर पंचायत प्रशासन तसेच पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्या पुढाकाराने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.धानोरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या हेटीलगतच्या तलावावर नगर पंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आता या तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने शहराच्या चढ भागात नळाचे पाणी पोहोचत नाही. विशेषत: धानोरा शहरात बाराही महिने एकचवेळा पाणी सोडले जाते. शहरातील सार्वजनिक हातपंप व विहिरींची पाणीपातळी खालावल्याने सध्या शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नगर पंचायतीच्या वतीने गेल्या आठवडाभरापासून पाणीटंचाई असलेल्या वॉर्डांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्यातर्फे सोडे मार्गावरील नवा प्लाट परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नगर पंचायतीच्या वतीने दररोज दोन ते तीन टँकर वॉर्डात पोहोचविले जात आहे. तर बरच्छा यांच्या वतीने दररोज पाच ते सहा टँकर वॉर्डा-वॉर्डात मोफत पोहोचविले जात आहे.पावसाळा सुरू होईपर्यंत सदर टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याचा उपक्रम सुरूच राहणार, अशी माहिती नगरसेवक ललीत बरच्छा यांनी दिली आहे. पाणीटंचाई असलेल्या वॉर्डांमध्ये टँकर पोहोचल्यानंतर घागर घेऊन गेलेल्या महिलांची गर्दी उसळत आहे. पाणीटंचाईची समस्या असल्याने धानोरा शहरात पाण्याचा वापरही नागरिकांकडून काळजीपूर्वक केला जात आहे. मे महिन्यात धानोरा शहरात पाणीसंकट आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपाययोजनांची गरज आहे.वराती डोहावर होणार नवी पाणी योजनाधानोरा शहरात व चढभागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असते. पाणी मिळविण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच लगबग सुरू होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी न.पं.च्या वतीने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ही योजना वराती डोहावर होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई