शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:12 IST

चामोर्शी नगर पंचायतीतर्फे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी भागात नगर पंचायतीची नळपाईपलाईन अद्यापही पोहोचली नाही. परिणामी या भागातील विहीर व हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलालडोंगरी प्रभागात पाणीटंचाई : नगर पंचायत प्रशासनाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीतर्फे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी भागात नगर पंचायतीची नळपाईपलाईन अद्यापही पोहोचली नाही. परिणामी या भागातील विहीर व हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.शहरातील प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी वसाहतीचा समावेश नगर पंचायतीत करण्यात आला. या वस्तीत एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चामोर्शी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या लालडोंगरी वस्ती ही चढभागावर आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रभागात पुरेसे हातपंप बसविण्यात आले. मात्र वाढत्या तापमानामुळे हातपंपाची पाणीपातळी खालावल्याने येथे अनेक कुटुंबांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन येथे नगर पंचायतर्फे पाण्याचा टँकर नियमितपणे पाठविला जात आहे.नगर पंचायतीच्या मालकीचा एक व दुसरा टँकर भाडेतत्त्वावर घेऊन प्रशासनाच्या वतीने दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नगर पंचायत कार्यालय परिसरात असलेल्या टाकीतून तसेच मार्कंडा रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. त्यानंतर हे टँकर लालडोंगरी वस्तीत पाठविली जात आहे. या प्रभागाचे नगरसेवक प्रमोद वायलालवार हे काही दिवसांपूर्वी सदर भागात जाऊन समस्यांबाबत पाहणी केली. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाईची समस्या त्यांच्यापुढे मांडली. याची दखल घेत त्यांच्या पुढाकाराने टँकरने पाणीपुरवठा होत आहे.अनेक भागात अत्यल्प पाणीपुरवठानगर पंचायत प्रशासनाच्या वतीने चामोर्शी शहराच्या १७ वॉर्डात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहरातील हनुमाननगर, मूल, आष्टÑी मार्गावरील वस्तीचा भाग हा चढ भाग आहे. त्यामुळे या भागात नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. काही नवीन वस्त्यांमध्येही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई